भाजपातील गटबाजी आता रस्त्यावर!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 25, 2021 04:14 AM2021-07-25T04:14:27+5:302021-07-25T04:14:27+5:30

इन्फो... त्या दोन नगरसेवकांवर कारवाई करणार: पालवे फलकप्रकरणी भाजप शहराध्यक्ष गिरीश पालवे यांनी कानावर हात ठेवले असून आपण पुण्याला ...

BJP's factionalism is now on the streets! | भाजपातील गटबाजी आता रस्त्यावर!

भाजपातील गटबाजी आता रस्त्यावर!

Next

इन्फो...

त्या दोन नगरसेवकांवर कारवाई करणार: पालवे

फलकप्रकरणी भाजप शहराध्यक्ष गिरीश पालवे यांनी कानावर हात ठेवले असून आपण पुण्याला असल्याचे सांगितले. मात्र, निवडणुकीत दोन नगरसेवक गैरहजर राहिल्याने त्यांना नोटिसा बजावण्यात आल्या असून त्यांच्याकडून उत्तर मिळाल्यानंतर कारवाई करण्यात येईल, असे ते म्हणाले.

इन्फो...

सानप म्हणाले, हांडगे यांना विचारतो

भाजपाचे सचिन हांडगे यांनी लावलेल्या फलकांप्रकरणी मी त्यांना विचारेल असे बाळासाहेब सानप यांनी लोकमतशी बेालताना सांगितले. प्रभाग निवडणुकीत गैरहजर प्रकरणाचा आपल्याशी संबंध नसल्याचेही त्यांनी सांगितले.

इन्फो..

संगमनेरे म्हणतात

नाशिकरोड प्रभाग सभापती निवडणुकीवेळी पक्ष विरोधी भूमिका घेण्याचा माझा कोणताही हेतू नव्हता. वैद्यकीय कारणांमुळे मुंबईला जावे लागल्याने मला या निवडणुकीवेळी हजर राहता येणार नाही, असे मी पक्षाला वेळेत कळवलेही होते. पक्षाने मला प्रभाग सभापतीपद दिले. स्थायी समितीवर संधी दिली. त्यामुळे बंडखोरीचा प्रश्नच उद्भवत नाही. भविष्यातही मी भाजपशीच एकनिष्ठ राहणार असल्याचा दावा नगरसेवक विशाल संगमनेरे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केला आहे. माझ्यामुळे पक्षाच्या वरिष्ठांवर विनाकारण दोषारोप करू नये, पक्ष घेईल तो निर्णय मला मान्य राहील, असेही त्यांनी नमूद केले आहे.

....

छायाचित्र आर फोटोवर २४ भाजप बोर्ड नावाने

Web Title: BJP's factionalism is now on the streets!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.