सिन्नरला भाजपचा अर्धा तास चक्का जाम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 27, 2021 04:10 AM2021-06-27T04:10:59+5:302021-06-27T04:10:59+5:30
सकाळी साडेअकरा वाजेच्या सुमारास नाशिक-पुणे महामार्गावर येथील बसस्थानकासमोर कार्यकर्त्यांनी ठिय्या आंदोलनास प्रारंभ केला. भाजप नेहमीच इतर मागासवर्गीय समाजाच्या हिताचे ...
सकाळी साडेअकरा वाजेच्या सुमारास नाशिक-पुणे महामार्गावर येथील बसस्थानकासमोर कार्यकर्त्यांनी ठिय्या आंदोलनास प्रारंभ केला. भाजप नेहमीच इतर मागासवर्गीय समाजाच्या हिताचे निर्णय घेत आला असून, महाविकास आघाडीमुळे ही परिस्थिती उद्भवल्याचा आरोप यावेळी करण्यात आला. महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका पुढे ढकलून ओबीसी समाजाची जातनिहाय जनगणना त्वरित करावी, अशी मागणी यावेळी आंदोलनकर्त्यांनी केली. पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांच्या नेतृत्वाखाली पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. आंदोलनात भाजपचे तालुकाध्यक्ष बाळासाहेब हांड, उपाध्यक्ष दत्ताजी गोसावी, भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष बंडूनाना भाबड, जिल्हा ओबीसी अध्यक्ष मनोज शिरसाठ, दिनकर कलकत्ते, ज्येष्ठ नेते भाऊसाहेब शिंदे, जयंत आव्हाड, सुरेश वरंदळ, सुभाष कर्पे, राजेश कपूर, भाऊसाहेब नाठे, रमेश डागा, सुनील माळी, छबू थोरात, सिन्नर तालुका प्रभारी शरद कासार, जिल्हा सरचिटणीस सविता कोठूरकर, जिल्हा सरचिटणीस शरद जाधव, भाजप महिला तालुकाप्रमुख चंद्रकला सोनवणे, भाजप ओबीसी आघाडीचे तालुकाध्यक्ष मुकुंद खर्जे, युवा मोर्चाचे अध्यक्ष सचिन गोळेसर, महिला तालुका उपाध्यक्ष रूपाली काळे, सुमन जोशी, सुनीता काळोखे यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.
फोटो - २६ सिन्नर निवेदन
सिन्नर येथे मागण्यांचे निवेदन तहसीलदार राहुल कोताडे यांना देताना भाजपचे तालुकाध्यक्ष बाळासाहेब हांडे, बंडूनाना भाबड, जयंत आव्हाड, राजेश कपूर, मनोज शिरसाठ, भाऊसाहेब शिंदे, सुरेश वरंदळ, सुभाष कर्पे यांच्यासह कार्यकर्ते.
===Photopath===
260621\26nsk_48_26062021_13.jpg
===Caption===
फोटो - २६ सिन्नर निवेदन सिन्नर येथे मागण्यांचे निवेदन तहसीलदार राहुल कोताडे यांना देतांना भाजपाचे तालुकाध्यक्ष बाळासाहेब हांडे, बंडूनाना भाबड, जयंत आव्हाड, राजेश कपूर, मनोज शिरसाठ, भाऊसाहेब शिंदे, सुरेश वरंदळ, सुभाष कर्पे यांच्यासह कार्यकर्ते.