भाजपाची यादी छुप्या पद्धतीने

By Admin | Published: February 3, 2017 01:22 AM2017-02-03T01:22:29+5:302017-02-03T01:24:04+5:30

आज थेट एबी फॉर्म : बंडखोरी टाळण्यासाठी धडपड

BJP's list hidden | भाजपाची यादी छुप्या पद्धतीने

भाजपाची यादी छुप्या पद्धतीने

googlenewsNext

नाशिक : महापालिका निवडणुकीसाठी इच्छुकांमधील रस्सीखेच त्यावर आमदार आणि प्रदेश प्रतिनिधींचे मतभेद या पार्श्वभूमीवर भाजपात गुरुवारी प्रचंड गोंधळाचे वातावरण होते. अशा स्थितीत आता यादी घोषित करून बंडखोरी वाढविण्याऐवजी भाजपाने छुप्या पद्धतीने उमेदवारांची नावे संबंधिताना शुक्रवारी सकाळी कळविण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचवेळी संबंधिताना एबी फॉर्म दिला जाणार आहे.
नाशिक महापालिकेच्या निवडणुकीसाठी गेल्या आठ दिवसांपासून भाजपात गोंधळाचे वातावरण आहे. भाजपाकडून उमेदवारी न मिळाल्यास बंडखोरी किंवा अन्य पक्षात धाव घेतली जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत आणि अनुपस्थितीत पदाधिकारी आणि आमदारांच्या मॅरेथॉन बैठका होत होत्या. बुधवारी पालकमंत्री गिरीश महाजन हे जळगाव येथील जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत उमेदवारांची नावे ठरविण्यासाठी गेल्यानंतर नाशिकमध्ये सारेच सैरभैर झाले होते. गुरुवारी रात्री ते नाशिकला येणार होते. पहाटे त्यांचे आगमन झाल्यानंतर सकाळपासूनच ठक्कर डोम जवळील त्यांच्या निवासस्थानी पदाधिकारी इच्छुक जमा झाले.

Web Title: BJP's list hidden

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.