श्रमिकांच्या हक्कांवर भाजपाकडून गदा :  अमरजित कौर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 26, 2018 01:01 AM2018-11-26T01:01:28+5:302018-11-26T01:02:20+5:30

येत्या जानेवारी महिन्यात श्रमिक कामगारांच्या राष्टÑव्यापी संपामध्ये प्रत्येकाने सहभागी व्हावे. या संपाला यशस्वी करण्यासाठी प्रत्येक घटकाचे सहकार्य गरजेचे आहे. श्रमिकांना संविधानाने दिलेल्या न्यायहक्कांवर भाजपाकडून गदा आणली जात असून, सरकारला श्रमिकांची ताकद दाखविण्याची वेळ आली आहे, असे प्रतिपादन कॉम्रेड अमरजित कौर यांनी केले.

 BJP's mace on the rights of workers: Amarjit Kaur | श्रमिकांच्या हक्कांवर भाजपाकडून गदा :  अमरजित कौर

श्रमिकांच्या हक्कांवर भाजपाकडून गदा :  अमरजित कौर

Next

नाशिक : येत्या जानेवारी महिन्यात श्रमिक कामगारांच्या राष्टÑव्यापी संपामध्ये प्रत्येकाने सहभागी व्हावे. या संपाला यशस्वी करण्यासाठी प्रत्येक घटकाचे सहकार्य गरजेचे आहे. श्रमिकांना संविधानाने दिलेल्या न्यायहक्कांवर भाजपाकडून गदा आणली जात असून, सरकारला श्रमिकांची ताकद दाखविण्याची वेळ आली आहे, असे प्रतिपादन कॉम्रेड अमरजित कौर यांनी केले.  अधिवेशनाच्या समारोपप्रसंगी रविवारी (दि.२५) आयोजित संविधान जागर सभेत कौर प्रमुख वक्ते म्हणून बोलत होत्या.  यावेळी व्यासपीठावर राज्य सरचिटणीस श्याम काळे, सुकुमार दामले, मोहन शर्मा, कृष्णा भोईर, दिली उताणे, सुमन पुजारी, जिल्हाध्यक्ष व्ही. डी. धनवटे, रावसाहेब ढेमसे, सुवर्णा मेतकर, विजय दराडे आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी कौर म्हणाल्या, भाजपाचे सरकार देशात व महाराष्टÑात असून या सरकारकडून बाबासाहेबांनी दिलेल्या संविधानावर हल्ला चढविला जात आहे. त्यामुळे संविधानाचा जागर करण्याची वेळ आली आहे. संविधानाच्या संरक्षणासाठी येत्या दि.९ जानेवारीला रस्त्यावर सर्व कामगार कष्टकरी उतरून सरकारवर हल्लाबोल करणार आहे, हे सरकारने लक्षात घ्यावे, असे कौर यावेळी म्हणाल्या. दरम्यान, आयटकची राज्य कार्यकारिणीची घोषणा यावेळी करण्यात आली. सी. एन. देशमुख यांची राज्य अध्यक्षपदी, तर दिलीप पवार यांची उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली.
हाताल लाल बावटा घेत घोषणाबाजी
अधिवेशनाच्या समारोपाच्या निमित्ताने दुपारी द्वारका ते बोधलेनगरपर्यंत पुणे महामार्गावरून आयटकच्या वतीने ‘संविधान बचाव फेरी’ काढण्यात आली. आयटकचा झेंडा हातात घेत शेकडो शेतकरी श्रमिक वर्ग या फेरीमध्ये सहभागी झाले होते. आशा सेविकांची संख्या यामध्ये लक्षणीय होती. ‘कामगारांना किमान वेतन, सामाजिक सुरक्षा द्या, कंत्राटी कामागारांना कायम करा, बांधकाम कामगारांचे प्रश्न सोडवा आदी मागण्यांचे फलक यावेळी कामगारांनी झळकाविले.
मोदी केवळ खोटी आश्वासने देऊ शकतात
सार्वजनिक क्षेत्र संपुष्टात आणून कंत्राटी व खासगीकरणावर भाजपाचे सरकार भर देत आहेत. बहुतांश क ष्टकऱ्यांना कामागारांचा दर्जा दिला गेला नाही, त्यामुळे त्यांना सगळ्या सुविधांपासून वंचित रहावे लागत आहे. शेतकरी व शेतमुजरांची मागील चार वर्षांपासून मोदी सरकारकडून दिशाभूल केली जात असल्याची टीका कौर यांनी यावेळी बोलताना केली. खोटी आश्वासने देण्यापलीकडे भाजपा सरकारला काहीही करता आले नाही. नोटाबंदीच्या निर्णयामुळे कामगारांना देशोधडीला लावले. हजारो ते लाखो कामगारांना नोकºयांवर पाणी सोडावे लागल्याचे त्यांनी सांगितले.

Web Title:  BJP's mace on the rights of workers: Amarjit Kaur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.