भाजपचे ‘महाराष्ट्र बचाव’ आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 22, 2020 08:51 PM2020-05-22T20:51:37+5:302020-05-22T23:46:31+5:30
मालेगाव : राज्य सरकारच्या विरोधात संपूर्ण महाष्ट्रात शुक्रवारी (दि.२२) फिजिकल डिस्टन्सिंग पाळत भारतीय जनता पार्टीतर्फे ‘महाराष्ट्र बचाव आंदोलन’ करण्यात आले. भाजप जिल्हाध्यक्ष सुरेश निकम यांच्या नेतृत्वात येथे आंदोलन करण्यात आले.
मालेगाव : राज्य सरकारच्या विरोधात संपूर्ण महाष्ट्रात शुक्रवारी (दि.२२) फिजिकल डिस्टन्सिंग पाळत भारतीय जनता पार्टीतर्फे ‘महाराष्ट्र बचाव आंदोलन’ करण्यात आले. भाजप जिल्हाध्यक्ष सुरेश निकम यांच्या नेतृत्वात येथे आंदोलन करण्यात आले.
कोरोनामुळे सर्वाधिक मृत्यूदर महाराष्ट्रात झाला असून, राज्य सरकार त्यावर कुठलेही नियंत्रण ठेवू शकले नाही यावरून सरकारचा नाकर्तेपणा देशासमोर आला आहे. सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे राज्यातील पोलीस, महसूल, महापालिका कर्मचारी आपल्या जिवाची पर्वा न करता आपले कर्तव्य बजावत आहे, त्यांचे हाल होत आहेत. जनतादेखील हवालदिल झाली असून, राज्यात मृत्यूचे थैमान माजले असताना केंद्र सरकारकडून आलेली आर्थिक मदतही सत्कर्मी न लावता त्यांचा भ्रष्टाचार करण्यात मशगूल असल्याचा आरोप करण्यात आला.
मालेगाव शहरासोबतच ग्रामीण भागातूनदेखील मोठ्या प्रमाणात आपापल्या घरांसमोर तसेच सोसायटीमध्ये निषेध करत आंदोलन करण्यात आले. यावेळी जिल्हाध्यक्ष सुरेश निकम, तालुका अध्यक्ष नीलेश कचवे, उपाध्यक्ष लकी गिल, युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष देवा पाटील, सुधीर जाधव, महिला आघाडी अध्यक्ष संगीता पवार, पोपट लोंढे आदी उपस्थित होते. यावेळी युवा मोर्चा तालुका अध्यक्ष धनंजय पवार, श्याम गांगुर्डे, अंकित पिंगळे, सुनील कोतकर, कुणाल निकम, संदीप मोरे, सुनील शेलार, समाधान कचवे, किरण टाक, सोमनाथ पवार, डॉ. वाघ, रोहन कुंवर, प्रशांत शेलार, जयेश शर्मा, देवीदास शिंदे, भूषण शिंदे, पप्पू पाटील आदी उपस्थित होते.
चांदवडला आंदोलन
चांदवड : तालुका भाजपच्या वतीने महाराष्ट्र राज्य सरकारचा निषेध करण्यात आला, तर चांदवड येथे भाजपच्या वतीने मेरा आंगण, मेरा रणांगण हे आगळे वेगळे आंदोलन करण्यात आले. यावेळी तालुकाध्यक्ष मनोज शिंदे, बाळासाहेब वाघ, अशोक भोसले, विलास ढोमसे, आत्माराम कुंभार्डे, भूषण कासलीवाल, डॉ. नितीन गांगुर्डे, प्रशांत ठाकरे, शांताराम भवर, संजय पाडवी, महेश खंदारे, मुकेश आहेर, कासिफ खान, शरद ढोमसे, नाना सलादे, योगेश साळुंखे, गणेश महाले, सुभाष पूरकर उपस्थित होते.