पुराव्यासोबतच चढणार भाजपाची पायरी

By admin | Published: February 13, 2017 12:43 AM2017-02-13T00:43:08+5:302017-02-13T00:43:08+5:30

भाजपाच्या उमेदवारांकडून दोन लाख रुपये घेण्याचा आणि उमेदवारीसंदर्भात दहा लाख रुपयांच्या मागणीसंदर्भातील व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर...

BJP's move to move ahead with the evidence | पुराव्यासोबतच चढणार भाजपाची पायरी

पुराव्यासोबतच चढणार भाजपाची पायरी

Next

नाशिक : भाजपाच्या उमेदवारांकडून दोन लाख रुपये घेण्याचा आणि उमेदवारीसंदर्भात दहा लाख रुपयांच्या मागणीसंदर्भातील व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर, वसंत स्मृती येथे आचारसंहिता पथकाने धडक दिली, परंतु भाजपा नेत्यांच्या प्रश्नांच्या सरबत्तीपुढे हे पथक नमले. आता मात्र, व्हिडीओ आणि वृत्तपत्रातील या पक्षाच्या नाराजांचे देवाण-घेवाणीचे आरोप या संदर्भात राज्य निवडणूक आयोगाचे मार्गदर्शन घेऊन, हे पथक पुढील आठवड्यात पुन्हा पक्ष कार्यालयावर धडकणार आहे.
महापालिकेच्या निवडणुकीत भाजपाच्या उमेदवारीचे वाद प्रचंड गाजले. ऐन वेळी पक्षात आलेल्यांना उमेदवारी देताना मोठे आर्थिक व्यवहार झाले, असे आरोप अनेक डावलल्या गेलेल्या कार्यकर्त्यांनी केले आहेत. त्यातच भाजपाच्या वसंत स्मृती येथील कार्यालयात उमेदवारांकडून दोन-दोन लाख रुपये घेण्याचा व्हिडीओ व्हायरल झाला. पाठोपाठ दहा लाख रुपये देऊनही उमेदवारी मिळाली नसल्याचा आरोप करणारा आणखी एक व्हिडीओ व्हायरल झाला. त्याची दखल घेत, गेल्याच आठवड्यात आचारसंहिता कक्षाच्या पथकाने वसंत स्मृती या भाजपा कार्यालयावर धडक दिली होती, परंतु पक्षाचे सरचिटणीस लक्ष्मण सावजी आणि अन्य पदाधिकाऱ्यांनी भाजपा कार्यालयात तपासणीसंदर्भात काही लेखी आदेश असतील तर दाखवा, अशी भूमिका घेतल्याने पथकाला माघारी फिरावे लागले होते. त्यानंतर, लेखी पत्र घेऊन येतो, असे सांगणारे पथकाचे अधिकारी अद्याप फिरकलेले नाहीत.

Web Title: BJP's move to move ahead with the evidence

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.