भाजपाची भूमिका दुटप्पी : निलम गो-हे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 8, 2019 01:41 AM2019-01-08T01:41:46+5:302019-01-08T01:42:46+5:30
युती न झाल्यास निवडणुकीच्या रिंगणात पटकून देऊ, अशी भाषा करणाऱ्यांच्या बारशाच्या घुगºया शिवसेना जेवली आहे, अशा शब्दात शिवसेनेच्या ज्येष्ठ नेत्या डॉ. नीलम गोºहे यांनी भाजपा अध्यक्ष शाह यांच्या वक्तव्याचा समाचार घेतला.
नाशिक : युती न झाल्यास निवडणुकीच्या रिंगणात पटकून देऊ, अशी भाषा करणाऱ्यांच्या बारशाच्या घुगºया शिवसेना जेवली आहे, अशा शब्दात शिवसेनेच्या ज्येष्ठ नेत्या डॉ. नीलम गोºहे यांनी भाजपा अध्यक्ष शाह यांच्या वक्तव्याचा समाचार घेतला. एकीकडे युतीची भाषा करायची व दुसरीकडे अहंकार, मद, मस्तवालपणा करायचा ही दुटप्पी भूमिका चालणार नाही, असेही त्या म्हणाल्या. डॉ. नीलम गोºहे यांच्या सामाजिक कार्यावर आधारित लेखिका अंजली कुलकर्णी यांनी ‘अपराजिता’ नावाचे पुस्तक लिहिले असून, विश्वकर्मा प्रकाशनाच्या या पुस्तकाचे अद्याप प्रकाशन झालेले नाही, तत्पूर्वी गोºहे यांनी आपल्या नाशिकच्या भेटीत सोमवारी काळारामाचे दर्शन घेऊन त्यांच्या चरणी पुस्तक अर्पण केले. त्यावेळी प्रसिद्धीमाध्यमांशी बोलताना त्यांनी भाजपावर जोरदार टीका केली. ज्यांनी निवडणुकीच्या प्रचारासाठी हनुमानाची जात शोधून काढली त्यांच्याविषयी काय बोलणार असा सवाल करून, तीन राज्यांत मोठा पराभव झाल्यामुळे पानिपतची अर्धी लढाई ते अगोदरच हरले आहेत. असे असताना युती न केल्यास शिवसेनेला पटकण्याची भाषा करणाºयांचे बारसे शिवसेना जेवली असून, युतीबाबत पक्ष अध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी अगोदरच पक्षाची भूमिका निश्चित केली असल्याचे त्या म्हणाल्या. साहित्य संमेलनाच्या अध्यक्षा नयनतारा सहगल यांना ऐनवेळी आयोजकांनी नाकारल्याबद्दल बोलताना गोºहे यांनी, त्यामागे आयोजकांवर राजकीय दबाव असल्याचे तसेच साहित्य संमेलनाध्यक्ष काय बोलणार हे त्यांचे भाषण अगोदरच आयोजकांनी मागून घेणे चुकीचे असल्याचे सांगितले.