पोटनिवडणुकीत भाजपाची सरशी

By admin | Published: August 30, 2016 02:05 AM2016-08-30T02:05:21+5:302016-08-30T02:05:48+5:30

महापालिका : मंदा ढिकले, सुनंदा मोरे विजयी; शिवसेना-मनसेला झटका

BJP's Sarashi in by-election | पोटनिवडणुकीत भाजपाची सरशी

पोटनिवडणुकीत भाजपाची सरशी

Next

 नाशिकरोड : जेलरोड प्रभाग ३५ व ३६च्या झालेल्या चुरशीच्या पोटनिवडणुकीत भारतीय जनता पार्टीच्या मंदाबाई बबन ढिकले (१९४६) व सुनंदा लक्ष्मण मोरे (१९३७) मते मिळवून विजयी झाले. मनपाच्या निवडणुकीत जेलरोड भागात २५ वर्षात पहिल्यांदाच ‘कमळ’ फुलले आहे.
जेलरोड प्रभाग ३५ (ब) व प्रभाग ३६ (ब) पोटनिवडणूक मतदानाची मतमोजणी सोमवारी सकाळी १० वाजता दुर्गा उद्यान येथील मनपा विभागीय कार्यालयात निवडणूक निर्णय अधिकारी आर. एम. बहिरम यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू झाली. मतमोजणीमुळे दुर्गा उद्यान कॉर्नर ते नाशिकरोड न्यायालय या ठिकाणी पोलिसांनी बॅरिकेटस् लावून वाहतूक बंद ठेवून सर्वांनाच प्रवेश नाकारला होता. प्रारंभी प्रभाग ३५ ची मतमोजणी दोन टेबलांवर घेण्यात आली. पहिल्या पाच मतदानयंत्रातील झालेल्या मतमोजणीत शिवसेनेच्या वृषाली नाठे व भाजपाच्या मंदाबाई ढिकले यांच्यात थोड्याफार मतांचा फरक असल्याने ‘नेट टू नेट’ लढत चालली होती, तर राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या वंदना चाळीसगावकर यांना दोन आकडी इतकेच मतदान मिळत होते, तर मनसेच्या शांताबाई शेजवळ यांना पहिल्या चार यंत्रांच्या मतदानात दोनच आकडीचे व पाचव्या यंत्रात तीन आकडी मतदान मिळाले, तर सहाव्या मतदानयंत्रापासून दहाव्या मतदानयंत्रापर्यंत भाजपाच्या ढिकले यांनी निर्णायक आघाडी कायम ठेवली. मतमोजणीअखेर भाजपाच्या मंदाबाई ढिकले (१९४६) मते मिळवून विजयी झाल्यात, तर शिवसेनेच्या वृषाली नाठे (१७४८) मते मिळवत १९८ मतांनी पराभूत झाल्या, तर मनसेच्या शांताबाई शेजवळ यांना (९९१), राष्ट्रवादी-कॉँग्रेस आघाडीच्या वंदना चाळीसगावकर (२६७) व एकाही उमेदवाराला नाही ‘नोटा’-६९ मतदान मिळाले. विशेष म्हणजे राष्ट्रवादीच्या चाळीसगावकर यांना एकाही यंत्रात ५० पेक्षा जास्त मतेदेखील मिळाली नाही. राष्ट्रवादी कॉँग्रेसचे डिपॉझिट जप्त झाले आहे.
भाजपाच्या मंदाबाई ढिकले हे विजयी झाल्याचे स्पष्ट होताच मतदान केंद्राबाहेर जमलेल्या भाजपा समर्थकांनी घोषणा देत जोरदार आनंदोत्सव साजरा केला. तर पराभवामुळे शिवसेनेच्या गोटात नाराजी पसरली होती. मनसे, राष्ट्रवादीचे पदाधिकारी या ठिकाणी फिरकलेदेखील नाही.
भाजपाच्या मोरे विजयी
प्रभाग ३६ (ब)च्या मतमोजणीमध्ये पहिल्या सहा फेऱ्यांमध्ये शिवसेनेच सुनील शेलार व कॉँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीचे शशिकांत उन्हवणे यांच्यात थोड्याफार मतांचा फरक होता. तर मनसेचे प्रवीण पवार हे तृतीय व भाजपाच्या सुनंदा मोरे यांना चतुर्थ क्रमांकाचे मतदान होते. मात्र नेहरूनगर मनपा शाळा येथे तीनही खोल्यांमध्ये जवळपास झालेले दोन हजार मतांची मोजणी होणे बाकी होते.

Web Title: BJP's Sarashi in by-election

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.