राज्य सरकारविरोधात भाजपाचा शंखनाद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 16, 2021 04:17 AM2021-02-16T04:17:25+5:302021-02-16T04:17:25+5:30
नाशिक : राज्याचे मदत व पुनर्वसनमंत्री विजय वडेट्टीवार यांनी साधूंविषयी केलेल्या वक्तव्यावरून वाद निर्माण झाला आहे. ...
नाशिक : राज्याचे मदत व पुनर्वसनमंत्री विजय वडेट्टीवार यांनी साधूंविषयी केलेल्या वक्तव्यावरून वाद निर्माण झाला आहे. वडेट्टीवार यांनी साधूंविषयी गैरउद्गार काढून हिंदू व जैन समाजातील साधूंचा अवमान केल्याचा आरोप करीत भाजपा आध्यात्मिक आघाडीतर्फे राज्य सरकार व विजय वडेट्टीवार यांच्याविरोधात निषेध नोंदविण्यासाठी पंचवटीतील रामकुंड येथे साधुसंतांसमवेत शंखनाद करून आंदोलन करण्यात आले.
भाजपा आध्यात्मिक आघाडीतर्फे सोमवारी (दि. १५) रामकुंडावर सरकारविरोधात शंखनाद व घोषणाबाजी करून आंदोलन करण्यात करण्यात आले. यावेळी भाजपा आध्यात्मिक प्रदेश संयोजक आचार्य तुषार भोसले यांनी विजय वडेट्टीवार यांनी समस्त साधुसंत, महंत यांची जाहीर माफी मागावी अशी मागणी केली. महाराष्ट्र ही संतांची भूमी असून नाशिक व त्र्यंबकेश्वर येथे भारतभरातून दर १२ वर्षांनी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या निमित्ताने साधुसंत येत असतात. नाशिक हे संतांच्या वास्तव्याने पुनित झालेले महानगर असून या शहरात संत-महंतांचा अपमान सहन करून घेतला जाणार नाही, असा इशाराही त्यांनी सरकारला दिला. यावेळी महामंडलेश्वर सोमेश्वरानंद स्वामी, अखिल भारतीय आखाडा परिषदेचे महंत भक्तिचरणदास, महंत फलाहारी, निवृत्तीनाथ महाराज संस्थानचे संजय धोंडगे, अनिकेत शास्त्री, अर्जुन महाराज पाटील, जय बाबाजी परिवाराचे विष्णू महाराज, रमणगिरी महाराज, अश्विनीनाथ महाराज, सीताराम महाराज, अशोक गवळी, रामसिंग बावरी, भाजपाचे शहर सरचिटणीस सुनील केदार, मंडल अध्यक्ष चंद्रशेखर पंचाक्षरी, अविनाश पाटील, देवदत्त जोशी, भास्कर घोडेकर, नगरसेवक योगेश हिरे, अजिंक्य साने, सुयोग वाडेकर, रुची कुंभारकर आदींसह भाजपाचे कार्यकर्ते व पदाधिकारी शंखनाद आंदोलनात सहभागी झाले होते.
===Photopath===
150221\15nsk_35_15022021_13.jpg
===Caption===
रामकुंडावर शंखनाद आंदोलन करताना भाजपा आध्यात्मिक आघाडीचे प्रदेश संयोजक आचार्य तुषार भोसले. समवेत महामंडलेश्वर सोमेश्वरानंद स्वामी, अखिल भारतीतय आखाडा परिषदेचे महंत भक्तिचरणदास, महंत फलाहारी, निवृत्तीनाथ महाराज संस्थानचे संजय धोंडगे, अनिकेत शास्त्री, अर्जुन महाराज पाटील, जय बाबाजी परिवाराचे विष्णु महाराज, रमणगिरी महाराज, अश्विनीनाथ महाराज आदी