ठाकरे सरकारच्या विरोधात भाजपची घोषणाबाजी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 22, 2020 07:50 PM2020-05-22T19:50:20+5:302020-05-22T19:57:35+5:30

नाशिक - भाजपच्या वतीने आज नाशिक शहरातही महाराष्टÑ बचावो आंदोलन करण्यात आले. कोरोनाबाबत राज्य शासन उपाययोजना करण्यात अपयशी ठरले ...

BJP's sloganeering against Thackeray government | ठाकरे सरकारच्या विरोधात भाजपची घोषणाबाजी

ठाकरे सरकारच्या विरोधात भाजपची घोषणाबाजी

Next
ठळक मुद्देकोरोना रोखण्यात अपयश आल्याचा ठपकाकायर्कर्त्यांच्या आंगणात आंदोलन

नाशिक- भाजपच्या वतीने आज नाशिक शहरातही महाराष्टÑ बचावो आंदोलन करण्यात आले. कोरोनाबाबत राज्य शासन उपाययोजना करण्यात अपयशी ठरले आहे. केंद्र शासनाने राज्य शासनाने देखील विविध घटकांसाठी संपुट (पॅकेज ) जाहिर करावे या मागणीसाठी हे आंदोलन करण्यात आले. भाजपच्या वतीने प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी राज्य स्तरावर या आंदोलनाची हाक दिली होती. त्यानुसार हे आंदोलन करण्यात आले. कोरोनाबाबत राज्यातील आघाडी सरकार नियंत्रण ठेवण्यात सरकार अपयशी ठरले आहे.

त्यामुळे महाराष्टÑात अनेकांचे बळी गेले आहेत. कोरोनाग्रस्तांवर मोफत उपचार करा, विविध घटकांसाठी केंद्र शासनाच्या धर्तीवर पॅकेज द्यावे अशा विविध मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात आले. सध्या लॉक डाऊन आणि संचार बंदी असल्याने आंगण हेच रणांगण समजून घराच्या परीसरात फलक उभारून आंदोलन करण्यात आले. त्यानुसार पक्षाचे नेते, पदाधिकारी, नगरसेवक आणि कार्यकर्त्यांनी आपल्या घराच्या प्रांगणात गॅलरीत फिजीकल डिस्टन्सिंगचे
पालन करतानाचा तोंडाला काळे मास्क आणि काळ्या रिबन लाऊन तसेच काळे कपडे घालून हे आंदोलन करण्यात आले. भाजप मुख्यालयाच्या समोर फिजीकल डिस्टसिंगचे पालन करून हे आंदोलन करण्यात आले. यात आमदार देवयानी फरांदे, आमदार राहुल ढिकले, शहराध्यक्ष गिरीश पालवे, सरचिटणीस प्रशांत जाधव आशिष नहार यांच्यासह अन्य काही कार्यकर्ते सहभागी होते. महाआघाडी सरकार जागे व्हा, कोरोनाग्रस्तांवर मोफत उपचार करा, असे फलक घेऊन हे आंदोलन करण्यात आले. खासदार भारती पवार, महापौर सतीश कुलकर्णी, आमदार सीमा हिरे,उपमहापौर भिकुबाई बागुल, सभागृह नेते सतीश सोनवणे, गटनेता जगदीश पाटील, स्थायी समिती सभापती गणेश गिते यांनी
आपल्या घराच्या परीसरात तसेच संपर्क कार्यालयाच्या प्रांगणात आंदोलन केले. याशिवाय भाजपाच्या विविध मंडल पदाधिकाऱ्यांनी देखील आपल्या कार्यक्षेत्रात आंदोलन केले
 

Web Title: BJP's sloganeering against Thackeray government

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.