शिक्षण सभापतिपदी भाजपाच्या सोनवणे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 29, 2018 11:39 PM2018-12-29T23:39:55+5:302018-12-30T00:27:18+5:30

नाशिक महापालिकेच्या शिक्षण समिती सभापतिपदाच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाच्या प्रा. सरिता सोनवणे यांची निवड करण्यात आली.

 BJP's Sonawane to be the Chairman of Education | शिक्षण सभापतिपदी भाजपाच्या सोनवणे

शिक्षण सभापतिपदी भाजपाच्या सोनवणे

Next

नाशिक : नाशिक महापालिकेच्या शिक्षण समिती सभापतिपदाच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाच्या प्रा. सरिता सोनवणे यांची निवड करण्यात आली. बहुमत भाजपाच्या बाजूने असूनही या निवडणुकीत शिवसेनेनेही उमेदवार उभा करून भाजपांतर्गत गटबाजीचा लाभ उचलण्याचा केलेला प्रयत्न फसून सभापती, उपसभापतिपदी सेनेचे उमेदवार पराभूत झाले. उपसभापतिपदी भाजपाच्याच प्रतिभा पवार यांची निवड करण्यात आली.
शिक्षण समितीवर भाजपाचे पाच, सेनेचे तीन व एक कॉँग्रेसचा सदस्य असल्याने साहजिकच भाजपाचा वरचष्मा असला तरी, सेनेने ही निवडणूक बिनविरोध होऊ नये म्हणून सुदाम डेमसे यांना सभापतिपदाची उमेदवारी दिली होती. तर भाजपाकडून सभापतिपदासाठी सरिता सोनवणे व उपसभापतिपदासाठी प्रतिभा पवार या दोघांनी उमेदवारी देऊन त्यांचे नामांकनही दाखल केले होते. परंतु सेनेने या निवडणुकीत चमत्कार करण्याच्या दृष्टीने दोन्ही जागांसाठी उमेदवारी अर्ज दाखल केले.
राहुल दिवे उशिराने दाखल
या निवडणुकीत भाजपाच्या विरोधात सेनेने उमेदवार दिल्यामुळे निवडणूक चुरशीचीही होईल, असा अंदाज बांधण्यात येत होता. कॉँग्रेसचे एकमेव उमेदवार राहुल दिवे यांनी सेनेला पाठिंबा दिला असला तरी, प्रत्यक्षात सभापतिपदाच्या निवडणुकीनंतर ते सभागृहात दाखल झाले. शिक्षण सभापतीची निवडणूक आज असल्याचे माहीत नव्हते, असा आश्चर्यकारक खुलासा त्यांनी केला. त्यामुळे उपसभापतिपदाच्या निवडणुकीत सेनेला दिवे यांचे एक मत अधिक मिळाले.

Web Title:  BJP's Sonawane to be the Chairman of Education

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.