भाजपाचे महावितरणला निवेदन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 2, 2020 04:05 PM2020-07-02T16:05:04+5:302020-07-02T16:06:47+5:30
पिंपळगाव बसवंत : लॉक डाउन झाल्यानंतर घेण्यात आलेल्या लाईट बिल रीडिंगचे अवाच्या सव्वा बिल आकारून आगोदरच कोरोनाचे दु:ख पेलवत असलेल्या नागरिकांना पुन्हा वाढीव बिलाचा झटका दिल्याने हे वाढीव बिले कमी करून द्यावे असे निवेदन पिंपळगाव भाजपाच्या वतीने महावितरण विभागाला देण्यात आले आहे.

निवेदनात म्हटल्याप्रमाणे पिंपळगाव शहरात वीज वितरण कंपनीकडून मागील तीन महिन्याचे रीडिंग एकाच वेळी घेतल्याने ग्राहकांना भरमसाठ रकमेचे बिल अंदाजे वाटप करण्यात आले आहे आणि हे बिलिंग अवाच्या सव्वा असल्याने कोरोणांमुळे उत्पन्नाचे स्तोत्र बंद असल्याने ग्राहक ते भरू शकणे अश्यक असल्याने ते लाईट बिल माफ करून ग्राहकांना दिलासा द्यावा असे निवेदन महावीतर विभागाचे व्यवस्थापक एकनाथ कापसे यांना देण्यात आले.
यावेळी भाजपा युवा मोर्चाचे सतीश मोरे, बापूसाहेब पाटील, प्रशांत घोडके, दत्तात्रय काळे, शितल बुरकुले, संदीप झुटे, दत्तात्रेय मोरे, अल्पेश पारक, योगेश लावर, चेतन मोरे, गौरव पंडित, प्रमोद दुसाने, नामदेव पवार, सचिन सूर्यवंशी, मदन पवार, संदीप जाधव, राजू खैरनार, गणेश आकडे, राहुल सोनवणे, नलिन बागुल आदी उपस्थित होते.