कळवण भाजपाचे महावितरणला वाढीव वीज बिलांबाबत निवेदन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 18, 2020 04:44 PM2020-08-18T16:44:05+5:302020-08-18T16:44:51+5:30

कळवण : भारतीय जनता पार्टी कळवणच्या वतीने शहर व तालुक्यातील जनतेला महावितरणकडून लॉकडाऊन काळात वाढीव बिलांची आकारणी करु न वीज ग्राहकांची पिळवणुक केली, याबाबत लक्ष वेधण्यासाठी महावितरणचे कळवण विभागाचे उपकार्यकारी अभियंता आंबडकर यांना निवेदन देण्यात आले.

BJP's statement to MSEDCL regarding increased electricity bills | कळवण भाजपाचे महावितरणला वाढीव वीज बिलांबाबत निवेदन

महावितरणच्या वाढीव बिलासंदर्भात उपकार्यकारी अभियंता आंबडकर यांना निवेदन देतांना नंदकुमार खैरनार, दीपक खैरनार, सुधाकर पगार, विकास देशमुख, निंबा पगार, गोविंद कोठावदे आदी.

Next
ठळक मुद्देलोकांच्या समस्या जाणून जनतेला सकारात्मक दिलासा मिळाला पाहिजे

कळवण : भारतीय जनता पार्टी कळवणच्या वतीने शहर व तालुक्यातील जनतेला महावितरणकडून लॉकडाऊन काळात वाढीव बिलांची आकारणी करु न वीज ग्राहकांची पिळवणुक केली, याबाबत लक्ष वेधण्यासाठी महावितरणचे कळवण विभागाचे उपकार्यकारी अभियंता आंबडकर यांना निवेदन देण्यात आले.
लॉकडाऊन काळात प्रत्यक्ष मिटर रिडींग न घेता सरासरीपेक्षा अवाजवी आकारण्यात आलेले वाढीव बील कमी करून त्यांची योग्य ती वीज आकारणी करण्यात यावी आणि लॉकडाऊन काळ त्यात अवाजवी बील यामुळे शेतकरी मजूर छोटे व्यावसायिक, आदिवासी वस्ती, पाडे, सामान्य नागरिक आदी लोकांचे महावितरण विभागाकडून वाढीव दर आकारु न आर्थिक संकट उभे केल्याचे दिसून येत आहे, तरी या संदर्भात आपल्याकडून लोकांच्या समस्या जाणून जनतेला सकारात्मक दिलासा मिळाला पाहिजे व वेळेत आपल्या यंत्रणेकडून रीडींग घेतले गेले पाहिजे. जेणेकरून अतिरिक्त चार्जेस वाढवून जनतेचे आर्थिक नुकसान होणार नाही, तसेच लॉकडाऊन काळातील विजबील वसुली एकदम न करता त्याचे टप्पे करण्यात यावे जेणेकरून ते भरण्यास जनतेला अडचण येणार नाही, व तक्र ारनिवारणासाठी स्वतंत्र कक्ष करण्यात यावा. निवेदनानुसार अंमलबजावणी त्वरित करण्यात यावी अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.
यावेळी शिष्टमंडळात जिल्हा महामंत्री नंदकुमार खैरनार, माजी जिल्हाध्यक्ष विकास देशमुख, तालुकाध्यक्ष दिपक खैरनार, सुधाकर पगार, शहराध्यक्ष निंबा पगार, राजेंद्र पगार, गोविंद कोठावदे, काशिनाथ गुंजाळ, मोतीराम वाघ, डॉ. अनिल महाजन, एस. के. पगार, हेमंत रावले, चेतन निकम, सचिन सोनवणे, उमेश पगार, संदीप अमृतकर, खंडू कापडणीस, रामकृष्ण पगार आदी उपस्थित होते.
 

Web Title: BJP's statement to MSEDCL regarding increased electricity bills

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.