वाढीव वीजबिलांबाबत भाजपचे निवेदन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 2, 2020 18:57 IST2020-08-02T18:57:22+5:302020-08-02T18:57:49+5:30

त्र्यंबकेश्वर : लॉकडाउनच्या काळात वीज ग्राहकांना जी बीले देण्यात आली. ती लॉकडाउन मुळे मीटर रिडींग न घेता सरासरीव एकरकमी देण्यात आली आहे. त्यामुळे वाढीव बिलांसंदर्भात भाजपच्या वतीने वीज वितरण कंपनीच्या प्रशासनास लॉकडाऊन कालावधीतील वाढीव वीजबिल कमी करावे, या मागणीचे निवेदन महावितरणचे सहायक अभियंता किशोर सरनाईक यांना देण्यात आले.

BJP's statement regarding increased electricity bills | वाढीव वीजबिलांबाबत भाजपचे निवेदन

वाढीव वीजबिलांबाबत भाजपचे निवेदन

ठळक मुद्देजुलै महिन्यात देखील जास्तीचे बिल वीज वितरण कंपनीतर्फे देण्यात आले आहे.

त्र्यंबकेश्वर : लॉकडाउनच्या काळात वीज ग्राहकांना जी बीले देण्यात आली. ती लॉकडाउन मुळे मीटर रिडींग न घेता सरासरीव एकरकमी देण्यात आली आहे. त्यामुळे वाढीव बिलांसंदर्भात भाजपच्या वतीने वीज वितरण कंपनीच्या प्रशासनास लॉकडाऊन कालावधीतील वाढीव वीजबिल कमी करावे, या मागणीचे निवेदन महावितरणचे सहायक अभियंता किशोर सरनाईक यांना देण्यात आले.
कोरोना लॉकडाऊनच्या कार्य काळात विजमीटरचे रिडिंग घेणे शक्य न झाल्यामुळे, महावितरण विभागाने त्र्यंबकेश्वर मधील नागरिक व व्यावसायिकांना मागील तीन महिन्यांचे सरासरी एकरकमी बिल पाठवले आहे. ते काहींनी भरले आहे. परंतु जुलै महिन्यात देखील जास्तीचे बिल वीज वितरण कंपनीतर्फे देण्यात आले आहे. त्यामुळे वाढीव वीजबिलतत्काळ कमी करण्याची मागणी निवेदनात करण्यात आली आहे.निवेदन देताना भाजपचे शहराध्यक्ष सुयोग वाडेकर, तालुकाध्यक्ष विष्णु दोबाडे, नगरसेवक दीपक लोणारी, सरचिटणीस सचिन शुक्ल, समीर दिघे, मयूर वाडेकर, निषाद चांदवडकर, राहुल खत्री आदी उपस्थित होते.
 
Web Title: BJP's statement regarding increased electricity bills

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.