मालेगावच्या समस्यांबाबत भाजपचे दरेकरांना निवेदन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 7, 2022 11:18 PM2022-02-07T23:18:16+5:302022-02-07T23:18:42+5:30
मालेगाव : तालुक्यातील विविध समस्या सोडविण्यात याव्यात, अशा मागणीचे निवेदन भाजपतर्फे विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांना भाजप जिल्हाध्यक्ष सुरेश निकम यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने दिले.

शहरात खासगी विवाह सोहळ्यानिमित्त दरेकर आले होते. त्यावेळी पदाधिकाऱ्यांनी त्यांची भेट घेऊन चर्चा केली.
निवेदनात म्हटले आहे की, मालेगाव तालुक्यात सध्या रासायनिक खते व खाद्य उपलब्ध होत नाही, वाढीव दराने त्याचे वितरण होते. शेतकऱ्यांना पीक विमा व अवकाळी नुकसानभरपाई मिळत नाही. ज्या शेतकऱ्यांना मिळाली त्यात अनियमितता आहे. कोरोनाकाळात मोठ्या प्रमाणात नुकसान होऊनही वीजबिल सक्ती केली जाते. वीज जोडणी तोडली जाते. पंतप्रधान आवास योजना ड यादीतील ७ हजार ३०० गरजू लाभार्थ्यांना वगळण्यात आले आहे. मंजूर घरकूल यादीत त्रुटी आहेत, आदी प्रश्नी चर्चा करण्यात आली. निवेदनावर सुरेश निकम, मदन गायकवाड, पंचायत समिती सदस्य अरुण पाटील, हरिप्रसाद गुप्ता आदींच्या सह्या आहेत.