मुंढेंना रोखण्यासाठी भाजपाची रणनीती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 1, 2018 01:48 AM2018-03-01T01:48:31+5:302018-03-01T01:48:31+5:30

महापालिका आयुक्तपदाचा कार्यभार स्वीकारलेल्या तुकाराम मुंढे यांनी ‘त्रिसूत्री’चा अवलंब करत विविध कामांना ब्रेक लावत आपल्या आगामी कारभाराचे संकेत दिल्यानंतर महापालिकेची अर्थवाहिनी समजल्या जाणाºया स्थायी समितीची आक्रमकता वाढविण्यासाठी सत्ताधारी भाजपाने रणनीती आखली आहे.

 BJP's strategy to stop shooter | मुंढेंना रोखण्यासाठी भाजपाची रणनीती

मुंढेंना रोखण्यासाठी भाजपाची रणनीती

Next

नाशिक : महापालिका आयुक्तपदाचा कार्यभार स्वीकारलेल्या तुकाराम मुंढे यांनी ‘त्रिसूत्री’चा अवलंब करत विविध कामांना ब्रेक लावत आपल्या आगामी कारभाराचे संकेत दिल्यानंतर महापालिकेची अर्थवाहिनी समजल्या जाणाºया स्थायी समितीची आक्रमकता वाढविण्यासाठी सत्ताधारी भाजपाने रणनीती आखली आहे. त्यानुसार, स्थायी समितीच्या रिक्त झालेल्या जागांवर लढाऊ ब्रिगेडला पुढे चाल देण्याचा निर्णय घेण्यात आला असून, बुधवारी (दि. २८) महासभेत घोषित करण्यात आलेल्या सदस्यांच्या नियुक्तीत त्याचा प्रत्यय आला आहे. महापालिकेच्या स्थायी समितीवरील आठ सदस्य नियमानुसार निवृत्त करण्यात आले. त्यात भाजपाचे ४, शिवसेनेचे २ आणि कॉँग्रेस व राष्टÑवादीच्या प्रत्येकी एका सदस्याचा समावेश होता. या रिक्त झालेल्या जागांवर नवीन सदस्यांची नियुक्ती करण्यासाठी महापौर रंजना भानसी यांनी बुधवारी (दि. २८) विशेष महासभा बोलावली होती. तुकाराम मुंढे यांनी आयुक्तपदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर ज्या पद्धतीने कामकाजाला सुरुवात केली आहे, त्याचा धसका सत्ताधारीसह विरोधी पक्षानेही घेतला आहे. कामांची आवश्यकता, तांत्रिक योग्यता व व्यवहार्यता या त्रिसूत्रीचा अवलंब करत त्यांनी आपल्या पहिल्याच महासभेत १५ कोटींच्या कामांचे प्रस्ताव मागे घेतले; शिवाय नगरसेवक निधीतील कामांसह २५७ कोटींच्या रस्ते विकासकामांनाही ब्रेक लावला. त्यामुळे सत्ताधारी भाजपासह विरोधी पक्षातही अस्वस्थता आहे. त्यातच स्थायी समितीवर गेल्या महिनाभरात कामांचे प्रस्ताव रोडावल्याने आगामी काळात स्थायीवरचे पद शोभेचे राहते काय, या भीतीपोटी अनेकांनी अगोदर शर्यतीत असूनही नंतर स्थायीवर यावर्षी सदस्य म्हणून जाण्यास नकार दर्शविला. त्यामुळे शिवसेनेसह कॉँग्रेस, राष्टÑवादीने बळजबरीने बोहल्यावर चढविले. मात्र, भाजपाने आयुक्तांना रोखण्यासाठी लढाऊ ब्रिगेडला पुढे चाल देण्याची रणनीती आखली असून, त्याचा प्रत्यय बुधवारी स्थायीवरील नियुक्तीने दिसून आला आहे. भाजपाने सभागृहनेता दिनकर पाटील, उद्धव निमसे, भाग्यश्री ढोमसे आणि पुष्पा आव्हाड यांना स्थायीवर पाठविले आहे, तर शिवसेनेने संतोष साळवे आणि संगीता जाधव यांना संधी दिली आहे. कॉँग्रेसने समीर कांबळे यांना चाल दिली आहे, तर राष्टÑवादीकडून सुषमा पगारे यांच्या गळ्यात बळजबरीने सदस्यत्वाची माळ टाकण्यात आली आहे. महासभेत महापौरांनी या आठ सदस्यांची निवड जाहीर केल्यानंतर त्यांचा सत्कार करण्यात आला.
भाजपाची पुढची यादीही तयार
सत्ताधारी भाजपाने स्थायीवरील सर्वच्या सर्व नऊ सदस्य बदलण्याचे ठरविले असून, रिक्त झालेल्या चार जागांवर आता दिनकर पाटील, उद्धव निमसे, भाग्यश्री ढोमसे आणि पुष्पा आव्हाड यांची नियुक्ती केली आहे. भाजपाच्या उर्वरित पाचही सदस्यांचे राजीनामे घेण्यात आले असल्याची माहिती शहराध्यक्ष बाळासाहेब सानप यांनी दिली. या पाच जणांच्या यादीत भाजपाचे गटनेते संभाजी मोरूस्कर, कमलेश बोडके, कोमल मेहरोलिया, भिकूबाई बागुल आणि हिमगौरी आडके यांची नावे अंतिम करण्यात आल्याचे समजते. शिवसेना व मनसेकडूनही उर्वरित सदस्यांचे राजीनामे घेऊन नव्या चेहºयांना संधी दिली जाणार आहे. येत्या ७ मार्च रोजी त्यासाठी विशेष महासभा होण्याची शक्यता आहे.

Web Title:  BJP's strategy to stop shooter

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.