एक सदस्यीय प्रभाग पद्धतीत भाजपाची कसोटी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 28, 2021 04:20 AM2021-08-28T04:20:11+5:302021-08-28T04:20:11+5:30

महापालिकेच्या सहाव्या पंचवार्षिक निवडणुकीत २४ पैकी १९ जागा भाजपला मिळाल्यानंतर या पक्षाची संपूर्ण पंचवटीत सत्ता असल्याचे चित्र आहे. माजी ...

BJP's test in one member ward system | एक सदस्यीय प्रभाग पद्धतीत भाजपाची कसोटी

एक सदस्यीय प्रभाग पद्धतीत भाजपाची कसोटी

Next

महापालिकेच्या सहाव्या पंचवार्षिक निवडणुकीत २४ पैकी १९ जागा भाजपला मिळाल्यानंतर या पक्षाची संपूर्ण पंचवटीत सत्ता असल्याचे चित्र आहे. माजी आमदार बाळासाहेब सानप यांच्या नेतृत्वाखाली निवडणुका लढवताना त्यांनी प्रतिष्ठेचा प्रश्न केला होता. पक्षाने सत्तेसाठी सर्वच शहरावर लक्ष केंद्रित केले असले तरी पंचवटीतून सर्वाधिक प्रतिसाद मिळाला. त्यामुळे यंदा रंजना भानसी यांना महापौरपद तर स्थायी समिती सभापतीपद उध्दव निमसे यांच्यानंतर सलग दोन वेळा गणेश गिते यांना देण्यात आले. जगदीश पाटील यांना गटनेता पद देण्यात आले होते. आता तर सभागृह नेता कमलेश बोडके हे सभागृह नेते तर अरुण पवार हे गटनेते असून देाघेही पंचवटी विभागातीलच आहे. याशिवाय भिकूबाई बागुल यांनाही पक्षाने उपमहापौरपद दिले आहे. पंचवटी प्रभाग समितीचे सभापतिपद सातत्याने भाजपकडेच होते.

अर्थात, पाच वर्षात बरेच राजकीय बदल झाले आहेत. सानप दोन पक्ष बदलून पुन्हा स्वगृही परतले आहेत. आमदार राहुल ढिकले आणि स्थायी समितीचे गणेश गिते हे देखील दोन कळीचे प्रमुख पदाधिकारी आता पंचवटीत आहेत. त्यातच राज्यातील सत्ता बदलानंतर आता त्याचा परिणाम महापालिकेच्या निवडणुकीवर होईल हे गृहीत धरून अनेक नगरसेवक कुंपणावरदेखील आहेत. यंदा अंतर्गत गटबाजी तसेच आता एक सदस्य प्रभाग रचना झाल्याने याचा फटका भाजप पक्षाला बसण्याची शक्यता असून त्यामुळे राजकीय समीकरण बदलाची चिन्ह निर्माण झाले आहे.

पंचवटी विभागात भाजपाच्य १९ नगरसेवकांच्या व्यतिरिक्त पूनम मोगरे एकमेव शिवसेनेच्या नगरसेविका पंचवटीत आहेत. त्यापाठोपाठ मनसेचे माजी महापौर अशोक मुर्तडक सलग पाच वेळा पंचवार्षिक निवडून आले आहेत. त्यांच्याबरोबर यंदा नंदिनी बोडकेदेखील मनसेकडून निवडून आल्या आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला खातेदेखील उघडता आले नव्हते. काँग्रेसच्या उमेदवारांनी ऐनवेळी बंडखोरी केल्याने काँग्रेसचीदेखील परिस्थिती राष्ट्रवादी काँग्रेससारखीच झाली होती. दोघा पुरस्कृत उमेदवारांनी विकास आघाडी माध्यमातून निवडणूक लढविली होती. त्यात माजी उपमहापौर गुरमीत बग्गा, विमल पाटील हे दोघे अपक्ष नगरसेवक म्हणून निवडून आले आहेत.

छायाचित्र- रंजना भानसी, अशोक मुर्तडक, उद्धव निमसे आणि गुरुमित बग्गा

Web Title: BJP's test in one member ward system

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.