भाजपचे दोन शिलेदार सेनेच्या मार्गावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 7, 2021 01:46 AM2021-01-07T01:46:02+5:302021-01-07T01:48:37+5:30

गेल्या काही दिवसांपासून भाजपत अस्वस्थ असणारे माजी प्रदेश उपाध्यक्ष वसंत गिते आणि सुनील बागुल हे दाेघे त्यांच्या मूळ स्वगृही म्हणजेच शिवसेनेत परतणार असल्याची चर्चा असली तरी अद्याप त्यावर निर्णय झालेला नाही. सुनील बागुल गुजरातच्या धरतीवर असून तेथून परतल्यानंतर निर्णय घेणार असल्याचे सांगितले.

BJP's two stone masons on the way | भाजपचे दोन शिलेदार सेनेच्या मार्गावर

भाजपचे दोन शिलेदार सेनेच्या मार्गावर

Next
ठळक मुद्देसंजय राऊत आज नाशकात भाजपाकडून मात्र इन्कार; राजकीय घडामोडीकडे सर्वांचे लक्ष

नाशिक : गेल्या काही दिवसांपासून भाजपत अस्वस्थ असणारे माजी प्रदेश उपाध्यक्ष वसंत गिते आणि सुनील बागुल हे दाेघे त्यांच्या मूळ स्वगृही म्हणजेच शिवसेनेत परतणार असल्याची चर्चा असली तरी अद्याप त्यावर निर्णय झालेला नाही. सुनील बागुल गुजरातच्या धरतीवर असून तेथून परतल्यानंतर निर्णय घेणार असल्याचे सांगितले. तर गुरूवारी (दि.७) शिवसेना नेते खासदार संजय राऊत नाशिक दौऱ्यावर येणार असून गिते यांच्या प्रवेशाबाबत त्यांच्याशी चर्चा होणार असल्याचे समजते.दरम्यान, भाजपाचे शहराध्यक्ष गिरीश पालवे यांनी या दोन्ही नेत्यांच्या अन्य पक्षात जाण्याचा इरादा असल्याचा इन्कार केला आहे. गिते आणि बागुल हे दोघेही हाडाचे शिवसैनिक असले तरी सध्या दोघेही भाजपत आहेत. यात त्यांच्या दोघांच्या कुटुंबीयांना अनुक्रमे उपमहापौरपद मिळाले असले तरी त्यांना स्वत:ला अपेक्षित पदे मिळाली नसल्याने ते नाराज असल्याचे सांगितले जात आहे. गेल्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसकडून गिते उमेदवारी करणार असल्याची देखील चर्चा होती. मात्र, त्यानंतरही हा विषय मागे पडला. परंतु तेव्हापासून गिते हे पक्ष सोडणार असल्याची चर्चा आहे. दुसरीकडे सुनील बागुल यांच्या बाबतीत देखील अशाच प्रकारे चर्चा सुरू आहे. उभयतांनी आपल्याला अन्य पक्षाच्या ऑफर्स असल्याचे सांगून योग्य तो निर्णय घेण्याचे जाहीर केल्याने भाजपात ते फार समाधानी नाहीत अशाच चर्चांना पुष्टी मिळत गेली. 
सध्या निवडणुकीचे वारे असल्याने भाजपाला डॅमेज करण्यास शिवसेना उत्सुक असून त्या दृष्टीने शिवसेनेतही त्यांच्या आगमनासाठी एक गट उत्साहात आहे. त्यातच गुरूवारी (दि.७) शिवसेना नेते खासदार संजय राऊत लोकार्पण आणि अन्य कामांसाठी नाशिकमध्ये येत असून त्यांच्या दौऱ्यात अनेक घडामोडी होण्याची शक्यता आहे. 
शिवसेनेतही अंतर्गत गटबाजी
n    भाजपासाठी आता आव्हानात्मक परिस्थिती निर्माण होत असून, पक्षाचे दोन ज्येेष्ठ नेते शिवसेनेच्या मार्गावर असल्याने संघटनात्मक पातळीवर त्याची दखल घेतली जात असल्याचे वृत्त आहे.  
n    भाजपाच्या बैठकींना सुनील बागुल हे नियमीतपणे उपस्थित राहात असले तरी वसंत गिते मात्र पक्ष कार्यालयात येत नसल्याचे सांगण्यात आले. पक्षाकडून त्यांना योग्य मान-सन्मान दिला जात नसल्याची त्यांच्या समर्थकांची भावना आहे. 
n    गिते-बागुल यांना शिवसेनेत आणण्यामागे या पक्षातील गटबाजी देखील चर्चेत येत आहे. सेनेतील काही बाजुला पडलेले नेते पुन्हा जोमाने पुढे येण्यासाठी सध्याच्या नेतृत्वावर नियंत्रण ठेवण्यासाठी ही खेळी खेळत असल्याचे वृत्त आहे. त्यामुळे सेनेतही दोन गट असल्याचे सांगण्यात येत आहे. 

Web Title: BJP's two stone masons on the way

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.