स्वच्छता मोहिमेत भाजपाचा वरचष्मा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 25, 2017 12:30 AM2017-09-25T00:30:00+5:302017-09-25T00:30:11+5:30
महापालिकेने आयोजित केलेल्या विशेष महास्वच्छता अभियानात पूर्णपणे भाजपाचाच वरचष्मा दिसून आला. शिवसेनेच्या पदाधिकाºयांसह अनेक नगरसेवकांनी या मोहिमेकडे पाठ फिरविली तर कॉँग्रेस-राष्टÑवादीसह मनसेच्या सदस्यांचीही अत्यल्प उपस्थिती दिसून आली. दरम्यान, शिवसेनेने या मोहिमेबाबत भाजपाला चिमटे काढले आहेत.
नाशिक : महापालिकेने आयोजित केलेल्या विशेष महास्वच्छता अभियानात पूर्णपणे भाजपाचाच वरचष्मा दिसून आला. शिवसेनेच्या पदाधिकाºयांसह अनेक नगरसेवकांनी या मोहिमेकडे पाठ फिरविली तर कॉँग्रेस-राष्टÑवादीसह मनसेच्या सदस्यांचीही अत्यल्प उपस्थिती दिसून आली. दरम्यान, शिवसेनेने या मोहिमेबाबत भाजपाला चिमटे काढले आहेत. राज्य सरकारने २२ सप्टेंबर ते २ आॅक्टोबर या कालावधीत विशेष महास्वच्छता अभियान राबविण्याचा कार्यक्रम महापालिकेला दिला आहे. त्यानुसार, या अभियानाचा शुभारंभ शालिमार चौकात पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत झाला. याठिकाणी झालेल्या कार्यक्रमाकडे शिवसेना पदाधिकाºयांसह नगरसेवकांनी पाठ फिरवली. भाजपाने सदर मोहीम ही पक्षविरहित असल्याचे जाहीर करत सर्व पक्षांतील कार्यकर्त्यांना सहभागी होण्याचे आवाहन केले होते. निमंत्रण पत्रिकेतही शिवसेनेच्या खासदारांपासून आमदार, पक्ष पदाधिकाºयांची नावे टाकण्यात आली होती. परंतु, मुख्य कार्यक्रमापासून सेनेच्या सदस्यांनी दूर राहणेच पसंत केले. शहरात शुक्रवारी झालेल्या मोहिमेत भाजपाचेच नगरसेवक व कार्यकर्ते दिसून आले. त्यामुळे सदर मोहीम ही महापालिकेची की भाजपाची असा प्रश्नही अनेकांना पडला. पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत शालिमार चौकाप्रमाणेच उंटवाडी तसेच संभाजी स्टेडियम येथेही कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्याठिकाणी, नियोजित वेळ सकाळची ९ वाजेची देण्यात आली होती. मात्र, पालकमंत्र्यांच्या आगमनाला उशीर होत असल्याचे पाहून उपस्थित सेना नगरसेवकांनी सिडको प्रभागचे सभापती व सेनेचे नगरसेवक सुदाम डेमसे यांच्या हस्ते नारळ फोडून शुभारंभ करून दिला. पालकमंत्री आले त्यावेळी सेना नगरसेवक नव्हते. कॉँग्रेस, राष्टÑवादी तसेच मनसेच्याही सदस्यांची अत्यल्प उपस्थिती दिसून आली.