नांदगावातील स्थितीबाबत भाजपचा इशारा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 14, 2021 04:17 AM2021-09-14T04:17:02+5:302021-09-14T04:17:02+5:30
नांदगाव : महापूर ओसरून एक आठवडा होत आला तरीदेखील शहरातील दलदल ‘जैसे थे’ असून, ठिकठिकाणी दुर्गंधी निर्माण झाली असल्याने ...
नांदगाव : महापूर ओसरून एक आठवडा होत आला तरीदेखील शहरातील दलदल ‘जैसे थे’ असून, ठिकठिकाणी दुर्गंधी निर्माण झाली असल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. ही परिस्थिती बदलण्यासाठी त्वरित पावले उचलली नाहीत तर भाजप ओबीसी मोर्चा लोकशाही मार्गाने आंदोलन करेल, असा इशारा देण्यात आला आहे.
या घटनेला कोण जबाबदार आहे नागरिक की प्रशासन, हा प्रश्न उपस्थित करण्यात आला आहे. १२ वर्षांपूर्वी पालिकेने खरेदी केलेली अग्निशमन दलाची गाडी अजून बंद खोलीत डांबून ठेवली आहे. शहर स्वच्छतेसाठी मनमाड, मालेगावहून गाड्या व मनुष्यबळ बोलवावे लागले. शाकंबरी व लेंडी नदी पुलाच्या मोऱ्या बंद असल्याने पुलावरून पाणी चढले. लेंडी नदीच्या पुलाची उंची वाढवावी, दोन्ही किनारी तटबंदी (संरक्षण भिंत) करावी. १२ वर्षांपूर्वीच्या विस्थापितांचे पालिकेने बांधलेल्या गाळ्यांमध्ये पुनर्वसन करावे. अशा मागण्या भाजप ओबीसी मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष संजय सानप यांनी केल्या आहेत.