नाशिकमध्ये मोबाईल टॉवरसाठी महापालिकेसमोर भाजयुमोचे उपोषण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 1, 2019 03:21 PM2019-06-01T15:21:36+5:302019-06-01T15:24:13+5:30
नाशिक- अन्न, वस्त्र, निवारा या माणसाच्या मुलभूत गरजा आहेत. परंतु आता इंटरनेट किंवा मोबाईल रेंज ही चौथी गरज निर्माण झाली आहे. शहरातील सातपुर भागातील काही ठिकाणी मोबाईल टॉवरचा अभाव असल्याने तेथील नागरीकांना मोठी अडचण होत आहे. त्यामुळे ही चौथी मुलभूत गरज भागविण्यासाठी म्हणजेच मोबाईल टॉवर बसविण्यास कंपन्यांना महापालिकेने परवानगी द्यावी यासाठी भाजयुमोच्या नेतृत्वाखाली राजीव गांधी भवनासमोर शनिवारी (दि.१) धरणे आंदोलन करण्यात आले.

सध्या तंत्रज्ञानाचे युग असून ही जीवनातील अपरिहार्यता आहे. सर्व कामकाज आता तंत्रज्ञानाच्या आधारावर होत असून इंटरनेट नसेल तर कामकाज ठप्प होते. नाशिक शहाराच्या अनेक भागात मोबाईल टॉवर नाहीत. त्यामुळे रेंज मिळत नसल्याच्या तक्रारी आहेत. सातपूर भागातील शिवाजी नगर, धु्रव नगर, श्रमिक नगर या भागात तर मोबाईल रेंज नसल्याने कोणाचा मृत्यू झाला तरी नागरीकांना स्थानिक ठिकाणी किंवा परगावी निरोपही देता येत नाही. मोबाईल कंपन्या टॉवर उभारण्यास तयार आहेत, परंतु महापालिकेकडून संंबधीतांना ना हरकत दाखला दिला जात नाही. त्यातच मध्यंतरी सुलभ शौचालय बांधून त्यावर मोबाईल कंपन्यांनी टॉवर उभारयचे तसेच त्या शौचालयांची देखभाल महापालिकेनेच करायची असा अजब प्रस्ताव महापलिकेने तयार केला होता. परंतु मोबाईल कंपन्यांनी नकार दिला. त्यामुळे या विषयाचे भिजत घोंगडे आहे. त्या पार्श्वभूमीवर महापलिकेने त्वरीत निर्णय घ्यावा अशी मागणी करणारे निवेदन आंदोलकांनी भाजयुमोचे चिटणीस अमोल पाटील, नगरसेवक वर्षा भालेराव, रविंंद्र धिवरे यांच्या नेतृत्वाखाली आयुक्त राधाकृष्ण गमे यांना निवेदन दिले.