काळ्या वाणाची द्राक्षे संकटात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 3, 2020 12:50 PM2020-02-03T12:50:08+5:302020-02-03T12:51:07+5:30

पिंपळगाव बसवंत : परिसरातील अनेक गावातील काळ्या वाणाच्या द्राक्षांवर अचानक आलेल्या अस्मानी संकटाने शेतकरी हवालदिल झाले आहेत. आधीच निर्यातक्षम ...

 Black arrow grapes in trouble | काळ्या वाणाची द्राक्षे संकटात

काळ्या वाणाची द्राक्षे संकटात

googlenewsNext

पिंपळगाव बसवंत : परिसरातील अनेक गावातील काळ्या वाणाच्या द्राक्षांवर अचानक आलेल्या अस्मानी संकटाने शेतकरी हवालदिल झाले आहेत. आधीच निर्यातक्षम द्राक्षे उत्पन्नात मोठ्या प्रमाणावर घट झाली आहे. सफेद वाणाच्या द्राक्षांवर याच वर्षी उकड्या जातीचा रोग पसरला आहे. द्राक्षमणी जळुन काळे पडले आहेत. या द्राक्षांवर नविनच रस शोषणाच्या पतंगाचा प्रार्दुभावाने बागा उध्वस्त झाल्या आहेत. ही द्राक्षे जानेवारी व फेब्रुवारी महिन्यातच तयार होऊन विक्री होतात. यातच गेली आठ ते दहा दिवसातच या नविन रोगाने अगदी काढणीला आलेले द्राक्षे संपुर्णपणे खराब झाल्याने संपुर्णपणे बागाचे नुकसान झाले आहे.
---------------
यावर्षी निसर्गाच्या असमतोलपणामुळे अनेक नविन रोग द्राक्षबागांवर पडले आहे. त्यातच काळ्या द्राक्षांवर रस शोषनारा किड्याच्या बंदोबस्तासाठी अजुन तरी उपाययोजना झालेली नाही.
-गणेश वाकळे, कृषी तज्ञ
------------------------
मागील वर्षी एक एकर बागेमध्ये सत्तर रूपये किलोचा दर मिळाला व चार लाखाचे उत्पन्न झाले. या वर्षी दिड लाख खर्च करून उत्पन्न कमी झाले.
-संपतराव बिलोट, द्राक्ष उत्पादक

Web Title:  Black arrow grapes in trouble

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Nashikनाशिक