मोदी सरकारविरोधी कामगारांचा ‘काळा दिवस’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 29, 2021 04:12 AM2021-05-29T04:12:34+5:302021-05-29T04:12:34+5:30
शेतकऱ्यांनी सिंधू बॉर्डरवर आंदोलन सुरू करून सहा महिने पूर्ण झाले आहेत. तरीदेखील मोदी सरकार हे कायदे मागे घेण्यास तयार ...
शेतकऱ्यांनी सिंधू बॉर्डरवर आंदोलन सुरू करून सहा महिने पूर्ण झाले आहेत. तरीदेखील मोदी सरकार हे कायदे मागे घेण्यास तयार नाही. सदर कायदे मागे घ्यावेत. कामगार व शेतकऱ्यांना न्याय द्यावा या मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी कामगारांनी आपापल्या शिफ्टनुसार कंपनीच्या गेटजवळ जमून काळे झेंडे दाखविले. काळा दिवस पाळून मोदी सरकारच्या या शेतकरी-कामगार विरोधी कायद्यांचा व धोरणांचा निषेध करण्यात आला. कामगारांनी गेटवर सोशल डिस्टन्स ठेवून तोंडाला मास्क लावून आंदोलन केले.
फोटो - २८ सिन्नर कामगार
सिन्नर तालुक्यातील मुसळगाव येथे रिंग प्लस अॅक्वा कारखान्याच्या प्रवेशद्वारावर मोदी सरकारविरोधी घोषणाबाजी करताना कामगार वर्ग.
===Photopath===
280521\28nsk_29_28052021_13.jpg
===Caption===
फोटो - २८ सिन्नर कामगार सिन्नर तालुक्यातील मुसळगाव येथे रिंग प्लस अॅक्वा कारखान्याच्या प्रवेशद्वारावर मोदी सरकारविरोधी घोषणाबाजी करताना कामगारवर्ग.