कळवणला भाजपकडून काळा दिवस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 26, 2021 04:12 AM2021-06-26T04:12:01+5:302021-06-26T04:12:01+5:30
कळवण : तत्कालीन पंतप्रधान स्व. इंदिरा गांधी यांनी २५ जून १९७५ रोजी देशाची राष्ट्रीय सुरक्षा धोक्यात असल्याचे ...
कळवण : तत्कालीन पंतप्रधान स्व. इंदिरा गांधी यांनी २५ जून १९७५ रोजी देशाची राष्ट्रीय सुरक्षा धोक्यात असल्याचे कारण देत आणीबाणी जाहीर केली होती. भारतीय लोकशाहीच्या दृष्टीने इतिहासात हा काळा दिवस असल्याचे सांगत कळवण भाजपच्या वतीने शुक्रवारी (दि.२५) काळा दिवस पाळण्यात आला.
याप्रसंगी स्वातंत्र्यसेनानी चंद्रसेन कळवणकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला. तसेच चंद्रसेन कळवणकर यांच्या पत्नी चंद्रकलाताई कळवणकर ह्या आणीबाणी काळातील साक्षीदार म्हणून त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी नंदकुमार खैरनार यांनी कळवण तालुक्यातील तत्कालीन समाजवादी चळवळीचे नेते चंद्रकांत कळवणकर यांच्या आणीबाणीच्या काळातील आठवणींना उजाळा दिला.
माजी जिल्हाध्यक्ष विकास देशमुख यांनीही मनोगत व्यक्त केले. याप्रसंगी भाजपचे तालुकाध्यक्ष दीपक खैरनार, नंदकुमार खैरनार, विकास देशमुख, गोविंद कोठावदे, सुधाकर पगार, निंबा पगार, डॉ.अनिल महाजन, विश्वास पाटील, एस. के. पगार, सचिन सोनवणे, कृष्णकुमार कामळस्कर, प्रकाश कडवे, सचिन सोनवणे, संदीप अमृतकार, हितेंद्र पगार, मनोहर बोरसे, चेतन निकम, किशोर तोटे, किशोर देशपांडे, श्रीकांत कुलकर्णी, नामदेव निकम आदीसह भाजप कार्यकर्ते व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सूत्रसंचालन विश्वास पाटील यांनी, तर आभार संयोजक कृष्णकुमार कामळस्कर यांनी मानले.
फोटो- २५ कळवण आणीबाणी.
कळवण येथे भाजपच्या वतीने आणीबाणीच्या ४५व्या वर्षपूर्तीला काळा दिवस साजरा करण्यात आला. त्याप्रसंगी दीपक खैरनार, नंदकुमार खैरनार, चंद्रकला कळवणकर, विकास देशमुख, गोविंद कोठावदे, सुधाकर पगार, निंबा पगार, डॉ.अनिल महाजन, विश्वास पाटील, सचिन सोनवणे आदींसह कार्यकर्ते.
===Photopath===
250621\25nsk_20_25062021_13.jpg
===Caption===
फोटो- २५ कळवण आणीबाणी कळवण येथे भाजपाच्या वतीने आणीबाणीच्या ४५ व्या वर्षपूर्तीला काळा दिवस साजरा करण्यात आला. त्याप्रसंगी दीपक खैरनार, नंदकुमार खैरनार ,चंद्रकला कळवणकर,विकास देशमुख, गोविंद कोठावदे,सुधाकर पगार, निंबा पगार, डॉ.अनिल महाजन, विश्वास पाटील, सचिन सोनवणे आदीसह कार्यकर्ते.