नाशिकमध्ये अग्निशमन कर्मचाऱ्यांची काळी दिवाळी, काळ्याफिती लावून केले कामकाज
By संजय पाठक | Published: October 26, 2022 07:06 PM2022-10-26T19:06:01+5:302022-10-26T19:09:21+5:30
वेतन फरक न मिळाल्याने आंदोलन, काळ्याफिती लावून केले कामकाज
संजय पाठक
नाशिक- महापालिकेतील सर्व कर्मचाऱ्यांना सातव्या वेतन आयोगाचा फरक मिळाला असला तरी अग्निशमन दलाच्या जवानांना अद्यापही फरकाची रक्कम मिळाली नाही. त्यामुळे आज या कर्मचाऱ्यांनी काळ्याफिती लावून कामकाज केले तसेच काळी दिवाळी साजरी केली. अग्निशमन दल कर्मचाऱ्यांची सिटू प्रणित कर्मचारी संघटना असून गेल्या सहा दिवसांपासून ते आंदोलन करीत आहेत. त्याची दखल न घेतल्याने आज या कर्मचाऱ्यांनी काळ्या फिती लावून काळी दिवाळी आंदोलन केले.
महापालिकेच्या अग्निशमन दलात मुळातच कर्मचारी वर्ग अपुरा आहे त्यानंतर त्यांना सातव्या वेतन आयोगाच्या वर्गाची रक्कम देण्याच्या हिशेबात मोठ्या प्रमाणात घोळ झाला असून प्रत्येक कर्मचाऱ्याला तीन ते चार लाख रुपयांचा आर्थिक फटका बसत आहे असा या कर्मचाऱ्यांचा आरोप आहे या संदर्भात महापालिका आयुक्त आणि मुख्या लेखापाल यांना निवेदन देऊन देखील त्यांनी दखल न घेतल्यामुळे अग्निशामक दलाच्या कर्मचाऱ्यांनी हे आंदोलन केले.