शवविच्छेदनगृहात काळाबाजार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 17, 2019 12:32 AM2019-03-17T00:32:46+5:302019-03-17T00:33:52+5:30
जिल्हा रुग्णालयातील प्रशासकीय शिक्क्यांसह अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सकांची प्रतिकृती तयार करून बेकायदेशीररीत्या विविध प्रकारचे वैद्यकीय प्रमाणपत्र देण्याचा काळाबाजार उघडकीस आला असून, विशेष म्हणजे या प्रकरणातील संशयित आरोपी मंगळे साळवे व त्याचा अज्ञात साथीदार रुग्णालयाच्या शवविच्छेदनगृहात राहूनच हा सर्व प्रकार करीत असल्याचे समोर आले असून, या प्रकरणी सरकारवाडा पोलीस ठाण्यात मंगळे साळवेसह त्याच्या अज्ञात साथिदाराविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नाशिक : जिल्हा रुग्णालयातील प्रशासकीय शिक्क्यांसह अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सकांची प्रतिकृती तयार करून बेकायदेशीररीत्या विविध प्रकारचे वैद्यकीय प्रमाणपत्र देण्याचा काळाबाजार उघडकीस आला असून, विशेष म्हणजे या प्रकरणातील संशयित आरोपी मंगळे साळवे व त्याचा अज्ञात साथीदार रुग्णालयाच्या शवविच्छेदनगृहात राहूनच हा सर्व प्रकार करीत असल्याचे समोर आले असून, या प्रकरणी सरकारवाडा पोलीस ठाण्यात मंगळे साळवेसह त्याच्या अज्ञात साथिदाराविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणीतील आरोपीने आपल्या ताब्यात एका बॅगमध्ये जिल्हा शल्य चिकित्सक नाशिक यांचा गोल रबरी स्टॅम्प, एक आडवा रबरी स्टॅम्प, तसेच अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक यांचा एक आडवा रबरी स्टॅम्प यासोबत कोऱ्या वैद्यकीय प्रमाणपत्रांचा गठ्ठा असल्याचा मिळून आला आहे. रबरी स्टॅम्पसह हे सर्व साहित्य आरोपीने बेकायदेशीररीत्या वैद्यकीय प्रमाणपत्र देण्यासाठी आपल्या अज्ञात साथीदाराच्या मदतीने तयार करून आपल्या कब्जात बाळगले म्हणून रुग्णालय अधीक्षक नानासाहेब निकम यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार शुक्रवारी (दि.१५) पोलिसांनी याप्रकरणी सरकारवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, जिल्हा रुग्णालयाचा शिक्का रुग्णालय प्रशासनाबाहेरील व्यक्तीकडे आढळल्याने एकच खळबळ उडाली असून, या शिक्क्यांचा विविध कारणांसाठी गैरवापर झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. दरम्यान, जिल्हा रुग्णालय प्रशासनाबाहेरील व्यक्तीकडे आढळलेले शिक्के हे बनावट असून, त्याने बाजारपेठेतील शिक्के तयार करणाºया कारागिराकडून तयार करून घेतल्याचा संशय जिल्हा प्रशानाने व्यक्त केला आहे.
प्रशासनाकडून अहवालानंतर कारवाई
दरम्यान, सदरचा प्रकार चर्चेत आल्यानंतर महापालिकेने या प्रकाराची गंभीर दखल घेतली असून प्रशासन उपआयक्त महेश बच्छाव यांनी संबंधित खातेप्रमुखांकडून अहवाल मागविला आहे. सदरचा कर्मचारी हा सफाई कर्मचारी असल्याने थेट चौकशी न करता प्रशासनाकडून
अहवाल मागविला आहे. त्यानंतर त्यावर कारवाई केली जाणार असल्याचे वृत्त आहे.