काळी मिरी १२५ रुपयांनी तर मसूर डाळ किलोमागे ५ रुपयांनी वाढली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 5, 2021 04:13 AM2021-04-05T04:13:47+5:302021-04-05T04:13:47+5:30

चौकट - कोथंबीर ५० रु. जुडी घाउक बाजारात गावठी कोथंबिरीला ५० ते ५५ रुपये जुडीचा दर मिळत आहे तर ...

Black pepper went up by Rs 125 per kg and lentils by Rs 5 per kg | काळी मिरी १२५ रुपयांनी तर मसूर डाळ किलोमागे ५ रुपयांनी वाढली

काळी मिरी १२५ रुपयांनी तर मसूर डाळ किलोमागे ५ रुपयांनी वाढली

Next

चौकट -

कोथंबीर ५० रु. जुडी

घाउक बाजारात गावठी कोथंबिरीला ५० ते ५५ रुपये जुडीचा दर मिळत आहे तर वांगी १०० रुपयांपासून २०० रु. जाळी या दराने विकली जात आहेत. पालेभाज्यांच्या दरात चांगली तेजी आली आहे.

चौकट-

डाळींमध्ये तेजी

किराणा बाजारात रवा, मैदा, आटा यांचे भाव स्थिर असले तरी डाळींमध्ये मात्र तेजी आली आहे. मध्यंतरी स्थिर असलेले खाद्यतेलाचे भावही वाढण्याचा अंदाज आहे. मसाल्याच्या पदार्थांना चांगली मागणी आहे.

चौकट-

चिकू ४० रु. किलो

फळबाजारात सर्वच फळांचे भाव वाढले आहेत. आवक स्थिर असून घाऊक बाजारात चिकुला २० रुपयांपासून ४० रुपये किलोचा दर मिळत आहे. डाळिंब, टरबूज, केळी, द्राक्ष या फळांचीही बाजार समितीत चांगली आवक आहे.

कोट-

किराणा बाजार सध्या स्थिर असून ग्राहकी चांगली आहे. बहुतेक मालाला उठाव चांगला आहे. इतर डाळींच्या तुलनेत मसूर डाळ पाच रुपयांनी वाढली आहे. - अनिल बुब, किराणा व्यापारी

चौकट-

गतवर्षी अनेक शेतकऱ्यांना भाजीपाला फेकून देण्याची वेळ आली होती. सध्यातरी भाजीपाल्याला बऱ्यापैकी भाव मिळत आहे. उत्पादन खर्चाचा विचार केला तर शेतकऱ्यांना फार काही मिळते असे नाही -दिलीप गायधनी . शेतकरी

कोट-

गॅस सिलिंडरसह किराणा आणि भाजीपाला या सर्वच गोष्टी महागल्याने स्वयंपाक घरात नेमके काय करावे, असा प्रश्न सकाळी निर्माण होतो. सर्व खर्च भागवितांना महिलांना मात्र तारेवरची कसरत करावी लागते. - शकुंतला जाधव, गृहिणी

Web Title: Black pepper went up by Rs 125 per kg and lentils by Rs 5 per kg

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.