काळ्या फिती लावून निषेध मोर्चा
By admin | Published: June 23, 2016 11:48 PM2016-06-23T23:48:56+5:302016-06-24T00:03:43+5:30
मनमाड : शहरातील विविध प्रश्नांकडे शासन दरबारी दुर्लक्ष
मनमाड : पाणीपुरवठ्यासह शहरातील विविध महत्त्वाच्या विकासकामांच्या प्रस्तावांची शासनदरबारी दखल घेतली जात नसल्याने शहराच्या खुंटलेल्या विकासाकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी गुरुवारी (दि. २३) शहरातून काळ्या फिती लावून मोर्चा काढण्यात आला. नगराध्यक्ष
प्रवीण नाईक यांच्या नेतृत्वाखाली काढण्यात आलेल्या या निषेध मोर्चामध्ये विविध पक्ष, संघटना, संंस्थांचे पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते.
मनमाड शहरातील रस्ते, आरोग्य, पाणीपुरवठा यांसह विविध विकासकामांचे प्रस्ताव शासनाकडे प्रलंबित आहेत. वारंवार पाठपुरावा करूनही याकडे दुर्लक्ष करण्यात येत आहे. शासनाचे याकडे लक्ष वेधण्यासाठी शहरातील सर्व राजकीय संघटना, पक्ष, संस्था यांना सोबत घेऊन शहराच्या विकासासाठी या मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. शहरातील छत्रे विद्यालय, इंडियन हायस्कूल, सेंट झेवियर्स शाळा, संत बार्णबा विद्यालयामधील विद्यार्थ्यांनी रॅलीमध्ये सहभाग घेतला होता. शहरासाठी पाणी द्या, रस्ते द्या अशा घोषणा यावेळी देण्यात आल्या.
मोर्चामध्ये नगराध्यक्ष प्रवीण नाईक, माजी आमदार राजाभाऊ देशमुख, माजी नगराध्यक्ष गणेश धात्रक, राजाभाऊ अहिरे, दिलीप सोळसे, राजाभाऊ छाजेड, योगेश पाटील, शिवसेना गटनेते संतोष बळीद ,अल्ताफ खान, सुनील पाटील, मयूर बोरसे, प्रवीण सूर्यवंशी, नगरसेवक रवींद्र घोडेस्वार, बब्बू कुरेशी, अकबर सोनावाला, संतोष अहिरे, विठ्ठल नलावडे, अॅड. सुधाकर मोरे, विलास कटारे, दिलीप नरवडे, गंगाभाऊ त्रिभुवन, योगेश निकाळे, वाल्मीक आंधळे उपस्थित होते. (वार्ताहर)ं