वनविभागात झळकल्या काळ्या फिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 1, 2021 04:16 AM2021-04-01T04:16:27+5:302021-04-01T04:16:27+5:30

हरिसाल मेळघाट व्याघ्र प्रकल्पाच्या कर्तव्यदक्ष वनपरिक्षेत्र अधिकारी दीपाली चव्हाण (आरएफओ) यांनी काही दिवसांपूर्वी वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या जाचाला कंटाळून शासकीय पिस्तुलने ...

Black ribbons shining in the forest | वनविभागात झळकल्या काळ्या फिती

वनविभागात झळकल्या काळ्या फिती

Next

हरिसाल मेळघाट व्याघ्र प्रकल्पाच्या कर्तव्यदक्ष वनपरिक्षेत्र अधिकारी दीपाली चव्हाण (आरएफओ) यांनी काही दिवसांपूर्वी वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या जाचाला कंटाळून शासकीय पिस्तुलने स्वत:वर गोळी झाडून घेत आत्महत्या केल्याच्या घटनेने संपूर्ण राज्य हादरले. या घटनेमुळे वनविभागात संताप व्यक्त होत आहे. त्यांनी सुसाईड नोटमध्ये लिहिल्याप्रमाणे उपवनसंरक्षक संशयित विनोद शिवकुमार, तसेच अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक एम. एस. रेड्डी हे दोघेही त्यांच्या आत्महत्येस कारणीभूत असल्याचा आरोप नाशिक वनवृत्तातील राजपत्रित वनधिकारी, वनक्षेत्रपाल, वनपाल, वनरक्षक संघटनांकडून करण्यात आला आहे. या दोघांवर निलंबनाऐवजी थेट बडतर्फची कारवाई करावी, तसेच चव्हाण आत्महत्या खटला थेट जलद न्यायालयात चालविला जावा, जेणेकरून मरणोत्तर तरी त्यांना लवकर न्याय मिळेल, या मागणीसाठी बुधवारी दिवसभर वनविभागाच्या प्रादेशिक कार्यालयांसह सामाजिक वनीकरण, वनविकास महामंडळ, वन्यजीव विभागाच्या कार्यालयांमध्येही सर्व अधिकारी, कर्मचारी वर्गाने काळ्याफिती लावून कामकाज केले. तसेच बहुतांश अधिकारी, कर्मचाऱ्यांचे व्हॉटसॲप डीपीवरदेखील ‘जस्टीस फॉर दीपाली’घोषवाक्यासह लिहिलेले सचित्र फलक झळकले होते.

---इन्फो--

‘विशाखा’ केवळ कागदोपत्री

नोकरीच्या ठिकाणी महिला अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या सुरक्षिततेसाठी व त्यांच्या न्याय, हक्कांसाठी स्थापन करण्यात आलेल्या विशाखा समित्या केवळ कागदोपत्री असल्याचाही आरोप नाशिक वनवृत्तातील महिला अधिकारी, कर्मचाऱ्यांनी केला आहे. या समित्यांची पुनर्रचना करून त्या अधिकाधिक सक्षम करण्याची मागणी जोर धरू लागली आहे. जेणेकरून महिलांना त्यांच्यावर कामाच्या ठिकाणी होणार अन्याय, अत्याचाराविरुद्ध दाद मागता येईल.

---

फोटो आर वर ३१ फॉरेस्ट/ फॉरेस्ट १ नावाने सेव्ह.

===Photopath===

310321\31nsk_54_31032021_13.jpg~310321\31nsk_55_31032021_13.jpg

===Caption===

काळ्या फिती लावून आंदोलन~काळ्या फिती लावून आंदोलन

Web Title: Black ribbons shining in the forest

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.