काळ्या मातीत मातीत.. तिफन चालती...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 10, 2020 09:53 PM2020-06-10T21:53:33+5:302020-06-11T00:58:09+5:30

नांदूरवैद्य : पावसाचे माहेरघर म्हणून ओळख असलेल्या इगतपुरी तालुक्यात खरीप पीक लागवडीची लगबग सुरू झाली असून, शेतकरी खरीप हंगामाच्या पेरणीपूर्व मशागतीची अंतिम तयारी करीत आहेत. येथील कृषी विभागाच्या वतीने ३३ हजार ५०० हेक्टर क्षेत्रावर खरीप पेरणीचे उद्दिष्ट ठेवले आहे.

In the black soil .. Tiffany walks ... | काळ्या मातीत मातीत.. तिफन चालती...

काळ्या मातीत मातीत.. तिफन चालती...

googlenewsNext

नांदूरवैद्य : पावसाचे माहेरघर म्हणून ओळख असलेल्या इगतपुरी तालुक्यात खरीप पीक लागवडीची लगबग सुरू झाली असून, शेतकरी खरीप हंगामाच्या पेरणीपूर्व मशागतीची अंतिम तयारी करीत आहेत. येथील कृषी विभागाच्या वतीने ३३ हजार ५०० हेक्टर क्षेत्रावर खरीप पेरणीचे उद्दिष्ट ठेवले आहे. इगतपुरी तालुक्यात रोहिणी नक्षत्राने जोरदार सलामी दिल्यानंतर यंदा पावसाचे प्रमाण चांगले असल्याचा अंदाज शेतकऱ्यांना आला आहे. गेल्या आठवड्यात निसर्ग वादळाचा थोडाफार तडाखा बसला असला तरी तालुक्यात सुमारे ४९० मिमी पावसाची नोंद झाल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.
इगतपुरी तालुका कृषी विभागाने तालुक्यातील घोटी आणि वैतरणा या तिन्ही मंडळ विभागात एकूण जवळपास सुमारे ३३ हजार ५०० हेक्टरवर यंदा खरिपाचे नियोजन केले आहे. यंदा प्रथमच इगतपुरी तालुक्यात मानवचलित भात लागवड यंत्राचा प्रयोग केला जाणार आहे. उत्पन्नवाढीसाठी शेतकºयांनी जमिनीचा पोत व पाण्याचा समतोल साधून योग्य पिकांची पेरणी करावी व चढ्या दराने बी-बियाणे, खते विक्र ी करणाºयांवर धडक कारवाईचा इशारा तालुका कृषी अधिकारी शीतलकुमार तंवर यांनी केले आहे.
मका १९ आणि वरई १ हजार २९७ हेक्टरवर पेरली जाणार आहे, तर उर्वरित हेक्टर क्षेत्रावर तूर, मूग, भुईमूग, उडीद, खुरसणी, सोयाबीन, वाल आदी तृणधान्य, कडधान्य व अन्नधान्य, वेलवर्गीय पिकांची पेरणी केली. यासाठी लागणारे बियाणे, औषधे, खतांचा साठा विविध कृषी केंद्रात उपलब्ध झालेला असून, दोन आठवड्यांपासून अनेक शेतकºयांना त्यांच्या बांधावर, गावात, घरी जाऊन निविष्ठा उपलब्ध करून दिली जात आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सोयाबीन या तेलवर्गीय पिकांच्या लागवडीसाठी शेतकºयांनी घरगुती पद्धतीचे बियाणे वापरावे यासाठी तालुक्यात जनजागृती केली जात आहे. कृषी विभागाच्या अंदाज पत्रकानुसार तालुक्यातील मुख्य भात पिकांचे क्षेत्र कमी करून, सोयाबीनला शेतकरी अधिक पसंती देतील, असे दिसून येत आहे.
कांदा, सोयाबीन, मक्याला पसंती
येवला : तालुक्यात खरीपपूर्व मशागतीत शेतकरी व्यस्त असून, यंदा तालुक्यातील पीक पॅटर्नमध्ये बदल होत असल्याचे दिसून येत आहे. कांदा, सोयाबीन, मका या पिकांकडे शेतकºयांचा कल वाढल्याने या पिकांचे तालुक्यातील क्षेत्र वाढणार असण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे, तर कपाशीचे क्षेत्र घटले आहे.
तालुक्यात खरिपाचे सर्वसाधारण ५४ हजार २३३ हेक्टर क्षेत्र आहे. प्रत्यक्षात मात्र सुमारे ६० हजार हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्रात खरीप पेरणी होते. तालुक्यातील शेती पडणाºया पावसावर अवलंबून आहे. गेल्या काही वर्षात तालुक्यात कांदा लागवडीत वाढ झाली असून, त्यापाठोपाठ मका, सोयाबीन पीक घेण्यास शेतकरीवर्गाची पसंती आहे. पीक पॅटर्न बदलामुळे तालुक्यातील कपाशीचे क्षेत्र घटले असून, तूर, उडीद, भुईमूग क्षेत्रातदेखील यंदा वाढ होईल, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.
तालुका परिसरात उत्तर-पूर्व भागात निसर्ग वादळाने आलेल्या पावसाने शेतजमिनीत ओल झाली. या ओलीवर अनेकांनी खरीप हंगामातील मका, बाजरी, मूग आदींच्या पेरण्या केल्या, तर काही भागात अजूनही समाधानकारक पाऊस नसल्याने पेरणीसाठी शेतकºयांना प्रतीक्षा करावी लागत आहे. कृषी विभाग तालुक्यात गावोगावी शेतकरी मेळावे घेऊन जनजागृती करत आहे.

Web Title: In the black soil .. Tiffany walks ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Nashikनाशिक