काळ्या फिती लावून कामकाज
By Admin | Published: January 17, 2016 10:20 PM2016-01-17T22:20:54+5:302016-01-17T22:22:14+5:30
द्वारसभा : गोंदे येथील कंपनी व्यवस्थापनाचा निषेध
काळ्या फिती लावून कामकाजद्वारसभा : गोंदे येथील कंपनी व्यवस्थापनाचा निषेधइगतपुरी : तालुक्यातील गोंदे येथील थायसन इंजिन कंपोनेट कंपनीच्या व्यवस्थापनाने येथील काम करणाऱ्या कामगारांना वेतनवाढ न करणे, कॅन्टीन सुविधा बंद करणे, पिण्याच्या पाण्याची सुविधा न पुरवणे, समस्याकडे दुर्लक्ष करून त्यांना त्रास देण्याचे काम सुरू केल्याचा आरोप करत कामगारांनी उपोषण करून, काळया फिती लावून कामकाज सुरू केले आहे.
कामगार आयुक्तानांही निवेदन दिले. मात्र याबाबत कोणत्याही प्रकारची दखल घेतली नाही. अनेक बैठकाही झाल्या मात्र न्याय मिळाला नाही. न्याय मिळण्यासंदर्भात द्वारसभा झाली. यावेळी सीटूचे अध्यक्ष डॉ. डी. एल. कराड, देवीदास आडोळे, सॅमसोनाईट कंपनीचे कमिटी मेंबर, मोनीयार कंपनीचे उमेदवार, रेनफ्रो कंपनी व पारले कंपनीचे उमेदवार तसेच थायसनचे कामगार मयूर जाधव, सागर मुसळे, महेश पाटील, मुकेश बोखारे यांच्या नेतृत्वाखाली काळ्या फिती लावून विविध मागण्यांसाठी द्वारसभा घेण्यात आली. गेल्या वर्षी सीटू युनियन लागली होती, ती व्यवस्थापनाने मान्य केली. त्यानंतर कामगारांचे मागणीपत्र कंपनी व्यवस्थापनाला देण्यात आले. कंपनी व्यवस्थापनाने हे मान्य नसल्याचे सांगितले. (वार्ताहर)