मारहाणीच्या निषेधार्थ काळ्या फिती लावून कामकाज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 20, 2018 01:16 AM2018-04-20T01:16:43+5:302018-04-20T01:16:43+5:30

नाशिक : महापालिकेत कर्तव्य बजावताना कर्मचाऱ्यांना झालेल्या मारहाणीच्या निषेधार्थ म्युनिसिपल कर्मचारी कामगार सेनेच्या नेतृत्वाखाली महापालिका कर्मचाºयांनी गुरु वारी (दि. १९) काळ्या फिती लावून कामकाज केले.

The blackjack on the wall | मारहाणीच्या निषेधार्थ काळ्या फिती लावून कामकाज

मारहाणीच्या निषेधार्थ काळ्या फिती लावून कामकाज

Next
ठळक मुद्दे महाजन यांची मध्यस्थी : सोमवारच्या आत निर्णय शक्य 

नाशिक : महापालिकेत कर्तव्य बजावताना कर्मचाऱ्यांना झालेल्या मारहाणीच्या निषेधार्थ म्युनिसिपल कर्मचारी कामगार सेनेच्या नेतृत्वाखाली महापालिका कर्मचाºयांनी गुरु वारी (दि. १९) काळ्या फिती लावून कामकाज केले.
राज्यशासनाने गुढीपाडव्यापासून प्लॅस्टिकबंदीचा निर्णय घेतला. त्यानंतर प्लॅस्टिकचा वापर करणाºयांच्या विरोधात 
मारहाणीच्या निषेधार्थ काळ्या फिती लावून कामकाज कारवाईचे आदेश देण्यात आले आहे. त्या आधारे महापालिकेने प्लॅस्टिक उत्पादक, विक्र ी व वापरकर्त्यांविरोधात दंडात्मक कारवाई सुरू केली आहे. नाशिकरोड येथे गेल्या मंगळवारी (दि. १७)विभागीय कार्यालयातील स्वच्छता निरीक्षक ज्ञानेश्वर किसन भोसले व कर्मचारी विजय मोरे, अनिल गांगुर्डे सकाळी ८ वाजता कर्तव्य बजावत असताना जेलरोडवरील थोरात पेट्रोलपंपालगत असलेला दूधविक्रे ता प्लॅस्टिकच्या पिशवीत दूध विक्र ी करताना आढळल्याने भोसले व त्यांच्या सहकाºयाने दंडात्मक कारवाई सुरू केली. त्यावेळी दूधविक्र ेत्याने भोसले यांना मारहाण केल्याची घटना घडली होती. त्यानंतर नाशिकरोड विभागातच मनपा कर्मचाºयास मारहाण करण्याची आणखी एक घटना घडली होती. त्याचे पडसाद गुरु वारी उमटले व राजीव गांधी भवनात म्युनिसिपल कर्मचारी कामगार सेनेच्या आवाहनानुसार कर्मचाºयांनी काळ्या फिती लावून या मारहाणीचा निषेध नोंदविला. यासंदर्भात संघटनेतर्फे मनपा आयुक्तांना निवेदन देण्यात आले असून, क्षेत्रीय स्तरावर काम करणाºया कर्मचाºयांना योग्य ती सुरक्षा उपलब्ध करण्याची मागणी यावेळी करण्यात आली.

Web Title: The blackjack on the wall

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.