पाणी योजनेच्या खर्चाचा हिशेब न देणाऱ्यांना काळ्या यादीत टाका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 18, 2021 04:20 AM2021-08-18T04:20:24+5:302021-08-18T04:20:24+5:30

वावीसह अकरा गाव प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेद्वारे दूषित पाणीपुरवठा होत असल्याने वावीचे सरपंच कन्हैयालाल भुतडा, पाणीपुरवठा समितीचे अध्यक्ष विजय काटे, ...

Blacklist those who do not account for the cost of the water scheme | पाणी योजनेच्या खर्चाचा हिशेब न देणाऱ्यांना काळ्या यादीत टाका

पाणी योजनेच्या खर्चाचा हिशेब न देणाऱ्यांना काळ्या यादीत टाका

Next

वावीसह अकरा गाव प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेद्वारे दूषित पाणीपुरवठा होत असल्याने वावीचे सरपंच कन्हैयालाल भुतडा, पाणीपुरवठा समितीचे अध्यक्ष विजय काटे, सदस्य प्रशांत कर्पे, संदीप राजेभोसले यांच्यासह ग्रामपंचायत सदस्यांनी आमदार कोकाटे यांना सदर कामाची पाहणी करण्याची विनंती केली होती. कोकाटे यांनी जिल्हा परिषद पाणीपुरवठा विभाग व महाराष्ट्र जीवन प्राधिकरणच्या अधिकाऱ्यांसोबत योजनेच्या कोळगाव माळ येथील जलशुद्धीकरण केंद्राची पाहणी केली. दुरुस्ती कामासाठी आलेले २७ लाख रुपये कुठे खर्च केले याचा जाब विचारत त्यांनी अधिकाऱ्यांना धारेवर घेतले. योजनेला पंधरा वर्षे पूर्ण होत आलीत. तरीदेखील जलशुद्धीकरण केंद्राचे वॉश आउटचे काम करण्यात आलेले नाही. परिणामी शुद्धीकरण न करताच पाणी योजनेतील गावांना सोडले जाते. लोकांच्या आरोग्याशी खेळण्याचा हा प्रकार आपण सहन करणार नाही. तातडीने वॉश आउटसाठी नवीन पाइपलाइनचा आराखडा तयार करा, अशा सूचना कोकाटे यांनी दिल्या. जलशुद्धीकरण केंद्राच्या दुरुस्तीचे काम अपेक्षेप्रमाणे झालेले नाही. ४५ एचपीचा पंप बसविण्याचे ठेकेदाराने सांगितले. मात्र तरीदेखील दीड लाख लिटर क्षमतेची पाण्याची टाकी भरायला बारा तासांचा अवधी का लागतो, कुठल्यातरी सटरफटर कंपनीचा पंप बसवून ठेकेदाराने बिल काढून घेतल्याचे उपस्थितांनी सांगितल्यावर दुरुस्तीसाठी मंजूर केलेल्या २७ लाखांचे नेमके काय केले याची तपासणी अधिकाऱ्यांनी करावी, निकृष्ट काम करणाऱ्या ठेकेदारास काळ्या टाकून त्याचे उर्वरित देणे देऊ नये. उरलेल्या बिलातून तातडीने आवश्यक दुरुस्ती करून शुद्ध पाणीपुरवठा योजनेतील गावांना करावा असे आदेश कोकाटे यांनी दिले. याबाबत अधिकाऱ्यांनी चालढकल केल्यास त्यांच्या चौकशीसाठी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना भेटू असेही त्यांनी सांगितले.

यावेळी वावीसह अकरा गाव पाणीपुरवठा समितीचे अध्यक्ष विजय काटे, सरपंच कन्हैयालाल भुतडा, ग्रामपंचायत सदस्य प्रशांत कर्पे, विनायक घेगडमल, रामराव ताजणे, मीना मंडलिक, प्रेमलता जाजू, अश्विनी वेलजाळी, कानिफनाथ घोटेकर, संपत चिने, नवनाथ नारोडे, विजय सोमाणी, ज्ञानेश्वर खाटेवर, जि.प. पाणीपुरवठा अभियंता मिस्तरी , बी.एम. खरे, जीवन प्राधिकरणचे एम.बी. भांगरे, उपअभियंता पी.एस पाटील, ए.डी. बिन्नर यावेळी उपस्थित होते.

इन्फो...

साठवण तलावदेखील वॉशआउट करावा

पाणीपुरवठा योजनांची केवळ फिल्टर प्लांट वॉश आउट करून उपयोग होणार नाही तर साठवण तलावदेखील वरच्यावर वॉश आउट करणे आवश्यक आहे. वावीसह वडांगळी येथील प्रादेशिक योजनांचे साठवण तलाव वॉश आउट करण्याच्या दृष्टीने सुधारित आराखडा तयार करावा, असे निर्देश आमदार कोकाटे यांनी दिले. तलावाच्या सभोवताली वाढणाऱ्या काटेरी झुडपांचादेखील वेळीच नायनाट करणे आवश्यक आहे, अशी सूचना त्यांनी केली.

फोटो - १७ कोकाटे

वावीसह अकरा गाव पाणीपुरवठा योजनेच्या जलशुद्धीकरण केंद्राची पाहणी करताना आमदार माणिकराव कोकाटे. समवेत वावीसह अकरा गाव पाणीपुरवठा योजनेचे अध्यक्ष विजय काटे, सरपंच कन्हैयालाल भुतडा व सदस्य.

Web Title: Blacklist those who do not account for the cost of the water scheme

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.