ब्लास्टर्स फाउण्डेशनतर्फे आदिवासी विद्यार्थ्यांना मदत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 6, 2019 06:23 PM2019-08-06T18:23:41+5:302019-08-06T18:23:58+5:30

त्र्यंबकेश्वर परिसरातील ब्रह्मगिरी घाटातील डोंगरात वसलेल्या महादरवाजा मेट गावातील विद्यार्थ्यांच्या विकासासाठी ब्लास्टर्स फाउण्डेशनच्या माध्यमातून विविध सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.

Blaster Foundation helps tribal students | ब्लास्टर्स फाउण्डेशनतर्फे आदिवासी विद्यार्थ्यांना मदत

ब्लास्टर्स फाउण्डेशनतर्फे आदिवासी विद्यार्थ्यांना मदत

googlenewsNext

नाशिक : त्र्यंबकेश्वर परिसरातील ब्रह्मगिरी घाटातील डोंगरात वसलेल्या महादरवाजा मेट गावातील विद्यार्थ्यांच्या विकासासाठी ब्लास्टर्स फाउण्डेशनच्या माध्यमातून विविध सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. या ठिकाणच्या सुमारे ४० शालेय मुले व तेवढेच शाळाबाह्य मुलांच्या विकासाचा विडा उचलत फाउण्डेशनतर्फे विविध साधनांच्या पूर्ततेचे काम नुकतेच सुरू करण्यात आले आहे. हत्तीच्या सोंडेप्रमाणे दिसणाऱ्या डोंगरात वसलेल्या महादरवाजा मेटमध्ये सुमारे २५ ते ३० घरे आहेत. सुमारे दोन ते अडीच किमीची डोंगरवाट चढून गेल्यानंतर गावात पोहोचता येते. येथील मुलांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी ब्लास्टर्स फाउण्डेशनने पुढाकार घेतला आहे. गावातील मुलांना फाउण्डेशनच्या वतीने बॅग, बूट यासह शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले. विद्यार्थ्यांना सोलर चार्जिंग लाइट युनिट देण्यात आले आहे. यासोबतच क्रि केट किट, फुटबॉल किट, इनडोअर गेमचे साहित्यही वाटप करण्यात आले. भर पावसात फाउण्डेशनच्या सदस्यांनी डोंगरवाट तुडवत गावाला भेट दिली. या उपक्र माबद्दल शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष रामदास बदादे, सुनील आहेर, सचिन मोरे यांच्यासह ग्रामस्थांनी फाउण्डेशनचे आभार मानले.
या उपक्र मात ब्लास्टर्स फाउण्डेशनच्या वतीने प्रथमेश लोहगावकर, कैलास सोनी, शिवम वैद्य, सुरज काबरा, हिमेश पाटील, यश कासट, मानसी पाटील, दिशा देसाई, सत्यनारायण मुंंदडा, नीलेश चव्हाण, मनीष कुमावत, देवेंद्र जोशी, लिनिका सोनवणे आदींसह सुमारे ५५ कार्यकर्ते सहभागी झाले होते. सदस्यांनी मुलांसोबत विविध खेळ खेळले.

Web Title: Blaster Foundation helps tribal students

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.