औषधसाठा जळून खाक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 11, 2018 02:18 AM2018-06-11T02:18:43+5:302018-06-11T02:18:43+5:30
सिन्नर: दिल्लीहून नाशिकला औषधसाठा घेऊन आलेल्या कंटनेरमधील औषधसाठ्याला अचानक आग लागून सुमारे ३५ ते ३६ लाख रुपयांचे नुकसान झाल्याची घटना सिन्नरच्या उद्योगभवन परिसरात सकाळी १० वाजेच्या सुमारास घडली.
सिन्नर: दिल्लीहून नाशिकला औषधसाठा घेऊन आलेल्या कंटनेरमधील औषधसाठ्याला अचानक आग लागून सुमारे ३५ ते ३६ लाख रुपयांचे नुकसान झाल्याची घटना सिन्नरच्या उद्योगभवन परिसरात सकाळी १० वाजेच्या सुमारास घडली.
दिल्ली येथील औषधाच्या कारखान्यातून गोळ्या-औषधांच्या गोण्या, बॉक्स व केमिकलचे ड्रम घेऊन कंटेनर (एम. एच. १२ पी. क्यू. २७८६) नाशिककडे येत असताना शनिवारी रात्री उशीर झाल्याने चालकाने सिन्नरजवळील उद्योगभवन परिसरात असलेल्या ‘व्ही ट्रान्स’ येथे उभा केला. सकाळी १० वाजेच्या सुमारास चालक कंटेनर घेऊन नाशिककडे निघण्याचा बेतात असताना कंटेनरच्या पाठीमागील पत्र्याच्या बॉडीतून धूर येत असल्याचे निदर्शनास आले.
मागील दरवाजा उघडल्यानंतर औषधाला आग लागल्याचे दिसून आले. गोळ्या औषधांचे बॉक्स, गोण्या व केमिकलच्या ड्रमला आगेने वेढले होते. व्ही. ट्रान्सपोर्टचे शाखा व्यवस्थापक शरद खालकर यांनी या प्रकरणी सिन्नर पोलिसांना खबर दिली. कंटेनरसोबत चालक एकटाच होता अशी माहिती पोलिसांनी दिली.
या प्रकरणी सिन्नर पोलीस
ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. पोलीस निरीक्षक मुकुंद देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस उपनिरीक्षक रामदास
धुमाळ, राहुल निरगुडे अधिक तपास करीत आहेत.