आगीमुळे चवताळलेल्या बिबट्याचा घरात घुसून हल्ला, दोघे गंभीर जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 26, 2019 01:31 PM2019-03-26T13:31:12+5:302019-03-26T13:31:20+5:30

सर्वतीर्थ टाकेद : इगतपुरीच्या पूर्वभागातील अधरवड येथील तारीचा मोढा येथील डोंगराला सोमवारी दुपारी लागलेल्या आगीच्या तीव्रतेने होरपळलेल्या व चवताळलेल्या बिबट्याने एका झोपडीत प्रवेश करत काळूबाई आगीवले या महिलेसह वनमजुर किसन बांगर यांच्यावर हल्ला केला. यात दोघेही जखमी झाले आहेत.

The blaze hit a house in the house and both were seriously injured | आगीमुळे चवताळलेल्या बिबट्याचा घरात घुसून हल्ला, दोघे गंभीर जखमी

आगीमुळे चवताळलेल्या बिबट्याचा घरात घुसून हल्ला, दोघे गंभीर जखमी

Next

सर्वतीर्थ टाकेद : इगतपुरीच्या पूर्वभागातील अधरवड येथील तारीचा मोढा येथील डोंगराला सोमवारी दुपारी लागलेल्या आगीच्या तीव्रतेने होरपळलेल्या व चवताळलेल्या बिबट्याने एका झोपडीत प्रवेश करत काळूबाई आगीवले या महिलेसह वनमजुर किसन बांगर यांच्यावर हल्ला केला. यात दोघेही जखमी झाले आहेत. सोमवारी दुपारी चार वाजेच्या दरम्यान डोंगराला आग लागली. ही आग विझवण्यासाठी वनविभागाचे वनपरिमंडळ अधिकारी गोरक्षनाथ जाधव यांच्या यंत्रणेखाली वनविभागाचे कर्मचारी तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. ही आग विझवत असतांना या आगीच्या तिव्रतेने होरपळलेल्या व चवताळलेल्या बिबट्याने या डोंगराशेजारील वस्तीतील एका झोपडीत प्रवेश केला असता चवताळलेल्या बिबट्याने या झोपडीतील काळूबाई आगीवले या महिलेसह वनमजुर किसन बांगर यांच्यावर हल्ला केलाव बिबट्याने जंगलात धूम ठोकली. चवताळलेल्या बिबट्याच्या या प्राणघातक हल्ल्यात बिबट्याने जोरदार चावा घेतल्याने व पंजाच्या आघाताने वनमजुर किसन बांगर यांच्यासह,काळूबाई आगीवले ही महिला गंभीर जखमी झाली असून तिला गोरक्षनाथ जाधव यांनी तात्काळ नाशिक येथील जिल्हा शासकीय रु ग्णालयात उपचारासाठी दाखल केले. नाशिक पश्चिम वनविभागाचे अधिकारी आर.टी. मगडम यांना ही माहिती कळताच नाशिक जिल्हा शासकीय रु ग्णालयात जाऊन त्यांनी भेट दिली व जखमी रु ग्णांची उपचारादरम्यान विचारपूस करून पाहणी केली.दरम्यान चवताळलेल्या बिबट्याच्या या हल्ल्याने अधरवडसह टाकेद परिसर हादरून गेला आहे. या परिसरात सर्वत्र घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे. भंडारदरावाडी वनपरिक्षेत्रचे वनपरिमंडळ अधिकारी गोरक्षनाथ जाधव यांच्या यंत्रणेखाली चवताळलेल्या बिबट्याला रेस्क्यू ,जेरबंद करण्यासाठी घटनास्थळी दोन पिंजरे लावण्यात आले असून वनरक्षक बी.व्ही.दिवे,एफ.जे. सैद,वनमजुर बगड, निर्गुडे,मदगे,यांच्यासह या ठिकाणी दोन वनरक्षक व सहा वनमजुर कार्यरत आहे.

Web Title: The blaze hit a house in the house and both were seriously injured

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Nashikनाशिक