बेस्ट इंग्लिश स्कूलमधील विद्यार्थ्यांसाठी आशीर्वाद समारंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 26, 2020 05:10 PM2020-02-26T17:10:25+5:302020-02-26T17:10:47+5:30

सटाणा : राष्ट्र निर्माणासाठी शाळेची भूमिका अत्यंत महत्त्वाची असल्याने शिक्षण व्यवस्थेचे चारित्र्य जतन झाल्यास राष्ट्राचे भविष्य स्पष्ट दिसते, असे प्रतिपादन न्यायाधीश व्ही. ए. आव्हाड यांनी केले.

   Blessing Ceremony for Best English School Students | बेस्ट इंग्लिश स्कूलमधील विद्यार्थ्यांसाठी आशीर्वाद समारंभ

  सटाणा येथील बेस्ट इंग्लिश मीडिअम स्कूलमधील दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी आयोजित निरोप समारंभाचे दीपप्रज्वलन करून उद्घाटन करताना न्यायाधीश व्ही. ए. आव्हाड व प्रा. संगीता आव्हाड. समवेत प्रा. भगवान आहेर, विश्वास चंद्रात्रे, संजय ब्राह्मणकार आदी. 

Next
ठळक मुद्दे येथील बागलाण एज्युकेशन सोसायटीच्या बेस्ट इंग्लिश मीडिअम स्कूलमधील दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी आयोजित आशीर्वाद समारंभात ते बोलत होते. यावेळी प्रा. संगीता आव्हाड, प्रा. भगवान आहेर, संस्थेचे अध्यक्ष विश्वास चंद्रात्रे, सहसचिव संजय ब्राह्मणकार आदी उपस्थित हो


न्या. आव्हाड म्हणाले की, शाळा फक्त शिक्षण देण्याचे नव्हे तर संस्कारही देण्याचे केंद्र असते. निकोप परीक्षा व निकाल प्रक्रि या पार पाडण्यासाठी शासनाचे नियम तसेच त्यासंबंधीची न्यायालयीन प्रक्रि येची भूमिकाही त्यांनी यावेळी सांगितली. प्रा. संगीता आव्हाड, प्रा. भगवान आहेर यांनीही परीक्षेविषयी मार्गदर्शन केले. अध्यक्ष विश्वास चंद्रात्रे यांनी मार्गदर्शन केले. यावेळी मुख्याध्यापक एस. जी. निकम, उपमुख्याध्यापक जयश्री गुंजाळ, शाळा विकास अधिकारी एन. एस. सोनवणे उपस्थित होते. रिद्धी व सिद्धी भामरे या जुळ्या बहिणींनी सूत्रसंचालन केले.
 

 

 

Web Title:    Blessing Ceremony for Best English School Students

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.