धडधाकटांना केले अंध, पंगू !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 20, 2019 12:22 AM2019-04-20T00:22:00+5:302019-04-20T00:27:31+5:30

निवडणुकीत जो मतदार एका पायाने अपंग होता, त्याचे दोन्ही पाय सुरळीत होते. अंध डोळस होता तर ज्याला मनोरुग्ण ठरवले तो तर सुज्ञपणे व्यापार करणारा आढळला... लोकसभा निवडणुकीची मतदार यादी किती बोगस आहे हा त्याचा खास नमुना काही अधिकाऱ्यांना आढळला आहे.

 Blind, lazy! | धडधाकटांना केले अंध, पंगू !

धडधाकटांना केले अंध, पंगू !

googlenewsNext

नाशिक : निवडणुकीत जो मतदार एका पायाने अपंग होता, त्याचे दोन्ही पाय सुरळीत होते. अंध डोळस होता तर ज्याला मनोरुग्ण ठरवले तो तर सुज्ञपणे व्यापार करणारा आढळला... लोकसभा निवडणुकीची मतदार यादी किती बोगस आहे हा त्याचा खास नमुना काही अधिकाऱ्यांना आढळला आहे. त्यामुळे मतदार यादी किती निर्दोेष आहे, याची चुणूकच प्राथमिक तपासणीत मिळाली आहेत.
यंदाच्या लोकसभा निवडणुकीत निवडणूक आयोगाने मतदार जागृती आणि मतदान करवून घेण्यावर अधिक भर दिला आहे. मतदान वाढावे यासाठी मतदारांना पाण्याची सोय तर उन्हात उभे राहण्यास लागू नये यासाठी मंडपदेखील घालण्याचे आदेश दिले आहेत. दिव्यांग मतदारांना तर घरून मतदान केंद्रापर्यंत ने-आण करण्यासाठी मोटारींची व्यवस्थादेखील करण्यात आली आहे. त्या अंतर्गत विविध अधिकाऱ्यांना खास दिव्यांगाची जबाबदारी देण्यात आली आहे. त्यांच्याशी चर्चा करून घेऊन अधिकाºयांनी त्यांना आपला भ्रमणध्वनी क्रमांक द्यायचा असून मतदानासाठी गाडीची सोय करणे गरजेचे असल्यास त्यानुसार ती केली जाईल असे सांगण्यात आले. यामुळे अधिकारी संबंधित दिव्यांगांची भेटदेखील घेत आहेत. तथापि, एका अधिकाºयाकडे अठरा दिव्यांग मतदारांची माहिती देण्यात आली होती. त्यानुसार त्याने घरभेटी दिल्यानंतर भलताच प्रकार आढळला. एका मतदाराला एक पाय नसल्याचे सांगण्यात आले होते. मात्र त्याठिकाणी गेल्यानंतर मतदाराला दोन्ही पाय असल्याचे आढळले तर अंध व्यक्ती हा प्रत्यक्षात डोळस होता आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे मनोरुग्ण म्हणून ज्या मतदाराची नोंद झाली तो उत्तम व्यापारी असल्याचे देखील आढळले असे अनेक ठिकाणी आढळले असून त्यामुळे मतदार यादी विषयी शंका घेतली जात आहे.
मतदार यादीसाठी निवडणूक शाखेने अनेक प्रकारची काळजी
घेतली आहे. विशेषत: दिव्यांग मतदारांची यादी तयार करण्यासाठी समाज कल्याण विभाग, जिल्हा रुग्णालय आणि दिव्यांगासाठी काम करणाºया संस्था यांची यादी घेतली आहे. मात्र तरीही यादी इतकी सदोष असेल तर काय होणार, असादेखील प्रश्न संबंधित अधिकारी वर्ग करीत आहेत.
संस्थाचालकांना भुर्दंड
जिल्हा प्रशासनाने मतदानासाठी शाळा घेतल्या असून, त्या तळमजल्यावरच असाव्यात असा कटाक्ष ठेवला आहे. यातील अनेक शाळा जुन्या आहेत. परंतु केवळ मतदानासाठी त्या केंद्रांवर दिव्यांग मतदार असो किंवा नसो सर्वांना रॅम्प करण्यास सांगितले असून त्याचा संस्थाचालकांना भुर्दंड बसला आहे.

Web Title:  Blind, lazy!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.