अंध मुलींनी केले कवितांचे वाचन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 6, 2018 12:34 AM2018-03-06T00:34:59+5:302018-03-06T00:35:29+5:30
: कवी कुसुमाग्रज यांच्या जयंतीनिमित्ताने नॅशनल असोसिएशन फॉर द ब्लाइन्ड युनिट महाराष्टÑ यांच्या वतीने अनोख्या पद्धतीने कुसुमाग्रज यांच्या कवितांचे ब्रेल लिपीत रूपांतर करून विविध १५ कवितांचे वाचन करण्यात आले.
नाशिक : कवी कुसुमाग्रज यांच्या जयंतीनिमित्ताने नॅशनल असोसिएशन फॉर द ब्लाइन्ड युनिट महाराष्टÑ यांच्या वतीने अनोख्या पद्धतीने कुसुमाग्रज यांच्या कवितांचे ब्रेल लिपीत रूपांतर करून विविध १५ कवितांचे वाचन करण्यात आले.अध्यक्षस्थानी सूर्यभान साळुंके होते.यावेळी ब्रेल लिपीतून निबंध स्पर्धेचेदेखील आयोजन करण्यात आले होते. शिक्षकांनीदेखील कुसुमाग्रजांच्या कवितांचे वाचन केले. कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून कुसुमाग्रज प्रतिष्ठानचे माजी विश्वस्त किशोर पाठक होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक नॅबचे सहसचिव मुक्तेश्वर मुनशेट्टीवार यांनी केले. प्रारंभी कुसुमाग्रजांच्या प्रतिमेला किशोर पाठक, सुनील गायकवाड, गायश्री चित्रमीमठ, शकुंतला दाणी, सूर्यभान साळुंखे, संजीवनी वंडेकर, श्याम पाडेकर यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला. कविता वाचन कार्यक्रमापूर्वी रचना विद्यालयाने घेतलेल्या संस्कृत श्लोक स्पर्धेत पारितोषिक प्राप्त केलेल्या नॅबच्या अंध मुलींना बक्षीस वितरण सुनील गायकवाड, गायत्री चित्रमीमठ, किशोर पाठक, दाणी यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वर्षा देशमुख व वर्षा जाधव यांनी केले तर श्याम पाडेकर यांनी परीक्षण केले. आभार शरद नागपुरे यांनी मानले. कार्यक्रमास महानॅब कार्यशाळा, नॅब बहुविकलांग केंद्र आणि कर्मचारी उपस्थित होते.
पारितोषिक वितरण
ब्रेल लिपीतील निबंध स्पर्धेत साक्षी जेजूरकर हिने प्रथम क्रमांक मिळविला, तर गायत्री पगार हिने तृतीय क्रमांक मिळविला. कुसुमाग्रजांच्या पंधरा कवितांचे ब्रेल लिपीत रूपांतर करून या कविता सादर करण्यात आल्या. काव्यवाचन स्पर्धेत प्रथम क्रमांक प्रांजल पाटील व यमुना चौधरी यांनी पटकाविला. द्वितीय क्रमांक चंद्रभागा मौळे, श्रेया माळी यांनी मिळविला, तर तृतीय क्रमांक गौतमी वाघ, स्मृती बैरागी यांनी पटकाविला. शिक्षकांमध्ये प्रथम क्रमांक निर्मला मते, लिना गायकवाड, द्वितीय क्रमांक बिलाल मनियार, संदीप बागुल, तर तृतीय क्रमांक छाया पाटील, कविता देवरे यांनी प्राप्त केला. विजयी स्पर्धकांना कवी किशोर पाठक यांच्या हस्ते पारितोषिक देण्यात आले.