बीएलओ शिक्षकांचे मानधन पाच दिवसांत होणार जमा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 12, 2020 04:31 AM2020-12-12T04:31:11+5:302020-12-12T04:31:11+5:30
मालेगाव : येथील उपविभाग अधिकारी कार्यालयामार्फत मतदार यादी दुरुस्ती, निवडणूक कार्ड, नवीन मतदार नोंदणी आदी निवडणुकांशी संबंधित कामांसाठी ...
मालेगाव : येथील उपविभाग अधिकारी कार्यालयामार्फत मतदार यादी दुरुस्ती, निवडणूक कार्ड, नवीन मतदार नोंदणी आदी निवडणुकांशी संबंधित कामांसाठी मालेगाव मध्यचे सुमारे २२३ शिक्षक व कर्मचार्यांची बीएलओ, ब्लॉक स्तरीय अधिकारी म्हणून निवड करण्यात आली आहे. या शिक्षकांनी आपले काम चालू ठेवले आहे; परंतु गेल्या दीड वर्षापासून बीएलओला शासनाने मंजूर केलेले मानधन कार्यालयाकडून मिळालेले नाही, त्यामुळे अखिल भारतीय उर्दू शिक्षक संघाचे संस्थापक साजिद निसार अहमद यांच्या नेतृत्वात शिष्टमंडळाने मालेगाव उपविभाग विभागीय अधिकारी विजयानंद शर्मा यांची भेट घेतली. बैठकीत अखिल भारतीय उर्दू शिक्षक संघाने यांनी बीएलओंच्या विविध अडचणीबाबत चर्चा करून बीएलओंचे थकीत मानधन त्वरित बँक खात्यात जमा करावे, अशा मागणीचे निवेदन दिले. यावर बीएलओंचे थकित मानधन ५ दिवसांच्या आत त्याच्या बँक खात्यात जमा करण्याचे आश्वासन प्रांत शर्मा यांनी दिले. बैठकीत अखिल भारतीय उर्दू शिक्षक संघाचे प्रदेश उपाध्यक्ष अल्ताफ अहमद, शहराध्यक्ष साजिद हमीद, सदस्य मुहम्मद फैज, सदस्य अल्ताफ महफूझ-उर-रहमान, अल्ताफ शबन, इब्राहिम शेख, मजहर अहमद आणि इतर सदस्य उपस्थित होते.