नागरी सुविधांप्रश्नी सोयगावी रहिवाशांचा रास्ता रोको
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 29, 2021 04:11 AM2021-06-29T04:11:16+5:302021-06-29T04:11:16+5:30
सोयगाव भागातील सुदाम नगर भागात नागरी सुविधांची वानवा आहे. प्रभाग क्रमांक १० मध्ये येणाऱ्या या भागात रस्ते, गटारी नाहीत ...
सोयगाव भागातील सुदाम नगर भागात नागरी सुविधांची वानवा आहे. प्रभाग क्रमांक १० मध्ये येणाऱ्या या भागात रस्ते, गटारी नाहीत .गेल्या दोन दिवसांपूर्वी झालेल्या पावसामुळे परिसरात पाणी साचले आहे. पाण्याचा निचरा होत नसल्याने नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. यामुळे संतप्त झालेल्या रहिवाशांनी सोमवारी मालेगाव - सटाणा रोडवर सोयगावच्या प्रवेशद्वाराजवळ रास्ता रोको आंदोलन केले. यावेळी या भागाच्या नगरसेविका आशाबाई अहिरे यांनी आंदोलकांच्या भावना जाणून घेतल्या. आंदोलनस्थळी उपमहापौर आहेर यांनी धाव घेत आंदोलकांशी चर्चा केली. महिनाभराच्या आत नागरी सुविधा पुरवल्या जातील, असे आश्वासन दिले. यानंतर सुदाम नगर भागातील पाहणी उपमहापौर आहेर यांनी केली.
आंदोलनात प्रशांत पाटील, रवींद्र पाटील, जगदीश साबळे, दादा शिंदे, अंबादास पाटील, बबन शेवाळे, अलकाबाई हिरे, सुनंदा शिंदे, मीराबाई पाटील आदी महिला सहभागी झाल्या होत्या.
------------
सोयगावच्या सुदाम नगर भागातील नागरी सुविधांप्रश्नी आंदोलकांशी चर्चा करताना उपमहापौर निलेश आहेर.
(२८ मालेगाव रास्ता रोको)
===Photopath===
280621\28nsk_13_28062021_13.jpg
===Caption===
२८ मालेगाव रास्ता रोको