पेठ येथे शिवसेनेचा रास्ता रोको
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 25, 2021 04:18 AM2021-08-25T04:18:38+5:302021-08-25T04:18:38+5:30
पेठ - केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्र्यांना उद्देशून केलेल्या वादग्रस्त विधानाचा पेठ तालुका शिवसेना व युवा सेनेच्या वतीने ...
पेठ - केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्र्यांना उद्देशून केलेल्या वादग्रस्त विधानाचा पेठ तालुका शिवसेना व युवा सेनेच्या वतीने निषेध करीत गुजरात राष्ट्रीय महामार्गावर जुना बसस्टँड परिसरात रास्ता रोको आंदोलन करीत घोषणा देण्यात आल्या. याप्रसंगी शिवसेनेचे तालुकाप्रमुख भास्कर गावित, सभापती विलास अलबाड, नगराध्यक्ष मनोज घोंगे, शहरप्रमुख गणेश शिरसाठ, ज्येष्ठ नेते पुंडलिक महाले, कुमार मोंढे, युवा सेना उपजिल्हाप्रमुख मोहन कामडी, तालुकाप्रमुख किरण भुसारे, जगदीश गावित, भारत पवार, प्रकाश धुळे यांच्यासह शिवसैनिक सहभागी झाले होते. (२४ पेठ शिवसेना)
-------------------------
राणे यांच्यावर कारवाईची शिवसेनेची मागणी
वणी : भारतीय जनता पार्टीच्या महाड येथील जन आशीर्वाद यात्रेत महाड येथे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबद्दल अपशब्द वापरल्याने शिवसेनेने नारायण राणे, आमदार नितेश राणे व नीलेश राणे यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी लेखी निवेदनाद्वारे सहायक पोलीस निरीक्षक स्वप्नील राजपूत यांच्याकडे केली आहे. भारतीय जनता पक्षाची जन आशीर्वाद यात्रा महाराष्ट्रात सुरू असून, त्या पार्श्वभूमीवर महाड येथे या यात्रेचे आयोजन करण्यात आले होते. राणे यांच्या वक्तव्यामुळे शिवसैनिकांच्या भावना दुखावल्या असून, नारायण राणे, नीलेश राणे व नितेश राणे यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्याची लेखी तक्रार विलास निरगुडे यांनी दिली आहे. सदरचे निवेदन देताना प्रदीप देशमुख, राजेंद्र गोतरणे, संतोष गवळी, जगन सताळे, राकेश थोरात व शिवसैनिक उपस्थित होते.
-----------------------------
निफाड, पिंपळगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल....
पिंपळगाव बसवंत : केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी केलेल्या विधानाच्या निषेधार्थ पिंपळगाव बसवंत पोलीस ठाण्यात शिवसैनिकांच्या वतीने पोलीस निरीक्षक भाऊसाहेब पटारे यांच्याकडे तक्रार अर्ज दाखल करून गुन्हा नोंदविण्यात आला आहे. याप्रसंगी उपजिल्हा प्रमुख नीलेश पाटील, पंचायत व जिल्हा परिषद असोसिएशनचे निफाड तालुका कार्याध्यक्ष राजेश पाटील, किरण लभडे, पिंपळगाव शहर अध्यक्ष नितीन बनकर, भाऊ घुमरे, समन्वयक आशिष बागूल, उप शहर प्रमुख संदीप भवर, प्रकाश वाटपडे, केशव बनकर, सचिन कायस्ते, नीलेश मोरे, रूपेश शिंदे, सागर झोमन, सागर दुसाने, प्रेम धोंगडे आदींसह शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
--------------------------
महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्र्यांबाबत बेताल वक्तव्य करणाऱ्या नारायण राणे यांचा शिवसैनिकांच्या वतीने जाहीर निषेध करण्यात आला. निफाड व पिंपळगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लवकरात लवकर राणे यांना पोलिसांनी अटक करून योग्य शासन करावे, अन्यथा शिवसैनिक नारायण राणे यांना फिरणे मुश्कील केले जाईल.
- नीलेश पाटील, शिवसेना उपजिल्हाप्रमुख (२४ पिंपळगाव राणे)
240821\24nsk_12_24082021_13.jpg
२४ पिंपळगाव राणे