दिंडोरीत शिवसेनेचा रास्ता रोको

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 2, 2021 11:32 PM2021-11-02T23:32:26+5:302021-11-02T23:33:46+5:30

दिंडोरी : तालुक्यातील रस्ते, वीज आदी प्रश्नांवर आवाज उठविण्यासाठी मंगळवारी दुपारी बारा वाजता शिवसेनेच्यावतीने दिंडोरी कळवण रस्त्यावरील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे रास्ता रोको करण्यात आला. दरम्यान, या आंदोलनात भाजपचे नेतेही सहभागी झाले. मात्र, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख सुनील पाटील यांनी कणखर भूमिका घेत आंदोलन शिवसेनेचे असून त्यात भाजपला नो एंट्री केली. त्यानंतर भाजप नेत्यांनी आंदोलनातून काढता पाय घेत पुढे काही काळ रस्त्यावर ठाण मारत तहसीलदार यांना मागण्यांचे निवेदन दिले.

Block Shiv Sena's way in Dindori | दिंडोरीत शिवसेनेचा रास्ता रोको

दिंडोरी येथे विविध मागण्यांसाठी पुकारण्यात आलेल्या आंदोलनात मार्गदर्शन करताना जिल्हाप्रमुख सुनील पाटील.

Next
ठळक मुद्देभाजपाला नो एंट्री : पदाधिकाऱ्यांनी घेतला काढता पाय

दिंडोरी : तालुक्यातील रस्ते, वीज आदी प्रश्नांवर आवाज उठविण्यासाठी मंगळवारी दुपारी बारा वाजता शिवसेनेच्यावतीने दिंडोरी कळवण रस्त्यावरील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे रास्ता रोको करण्यात आला. दरम्यान, या आंदोलनात भाजपचे नेतेही सहभागी झाले. मात्र, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख सुनील पाटील यांनी कणखर भूमिका घेत आंदोलन शिवसेनेचे असून त्यात भाजपला नो एंट्री केली. त्यानंतर भाजप नेत्यांनी आंदोलनातून काढता पाय घेत पुढे काही काळ रस्त्यावर ठाण मारत तहसीलदार यांना मागण्यांचे निवेदन दिले.
शिवसेना कार्यालय ते पालखेड चौफुलीपर्यंत हातात भगवे झेंडे घेऊन जिल्हाप्रमुख सुनील पाटील, माजी आमदार रामदास चारोस्कर, माजी आमदार धनराज महाले, माजी जिल्हाप्रमुख भाऊलाल तांबडे, तालुकाप्रमुख पांडुरंग गणोरे यांच्या नेतृत्वाखाली रॅली काढत रास्ता रोको करण्यात आला. यावेळी सुनील पाटील यांनी तालुक्यातील रस्त्यांची प्रचंड दुरवस्था झाली असून येथील लोकप्रतिनिधी यांच्याकडून दुर्लक्ष होत आहे. तरी त्वरित सर्व रस्त्यांची कामे सुरू करावीत. ज्या रस्त्यांची कामे मागील काळात झाली त्याची दुरुस्ती करण्याची जबाबदारी संबंधित ठेकेदारांची असताना दुरुस्ती होत नाही तरी अधिकाऱ्यांनी त्वरित दुरुस्ती करून घ्यावी अन्यथा शिवसेना स्टाईल आंदोलन करण्यात येईल तसेच वीज मंडळाने सबुरीने घ्यावे. वीजपुरवठा सुरळीत ठेवावा, वीज बिल वसुलीसाठी शेतकऱ्यांना वेठीस धरू नये, असे सांगितले.

इंधन दरवाढीवरून केंद्र सरकारवर हल्लाबोल केला. यावेळी संतोष मुरकुटे, कैलास पाटील, नाना मोरे, सदाशिव गावित, वसंत थेटे, सुरेश देशमुख, सुनील मातेरे, किरण कावळे, डॉ. विलास देशमुख, नदीम सय्यद, सचिन देशमुख, सोनू देशमुख, नीलेश शिंदे, अविनाश वाघ, शैला उफाडे, सुमन घोरपडे, रत्ना जाधव आदी उपस्थित होते. यावेळी पोलीस निरीक्षक प्रमोद वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

दिवाळीनंतर कामांना सुरुवात...
यावेळी तहसीलदार पंकज पवार यांना निवेदन देण्यात आले, तर सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता धनंजय देशमुख यांनी तालुक्यातील रस्त्यांच्या ६० कोटींच्या कामांना मंजुरी मिळाली असून दिवाळीनंतर लगेचच कामांना सुरुवात करण्यात येणार आहे, असे सांगितले. दरम्यान, आंदोलनामुळे दिवाळी निमित्ताने आलेल्या नागरिकांना वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागले. सुमारे एक तास वाहतुकीची कोंडी झाली होती.

शिवसेनेच्या आंदोलनात भाजपाला नो एंट्री
तालुक्यातील रस्ते, वीज आदी विविध प्रश्नांवर लक्ष वेधण्यासाठी मंगळवारी शिवसेनेचे आंदोलन होणार होते. त्यात ते राष्ट्रवादी वगळता इतर सर्व पक्ष एकत्र येणार होते व तसे आवाहन केले गेले. चौफुलीवर सकाळी आंदोलन सुरू झाले. ह्या आंदोलनात भाजपाचे तालुकाध्यक्ष नरेंद्र जाधव, माजी नगराध्यक्ष प्रमोद देशमुख नगरसेवक तुषार वाघमारे, रणजित देशमुख यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी सहभाग घेतला. मात्र, त्यास सेनेचे जिल्हाप्रमुख व शिवसैनिकांनी आक्षेप घेतला व भाजपाला आंदोलनात नो एंट्री असल्याचे सांगताच भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी आंदोलनातून उठून जात समोरच रस्त्यावर ठाण मांडले. सत्ताधारी सरकारविरोधात घोषणाबाजी केली व लगेचच तहसीलदार पंकज पवार यांना निवेदन दिले. भाजप तालुकाध्यक्ष यांनी शिवसेनेचे आमंत्रण आल्याने आपण आंदोलनात सहभागी होण्यासाठी आलो होतो असे सांगत झाल्या प्रकाराबद्दल नाराजी व्यक्त केली
आहे.

 

Web Title: Block Shiv Sena's way in Dindori

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.