येवल्यात शेतकरी संघटनेचा रास्ता रोको!

By ऑनलाइन लोकमत | Published: August 21, 2023 03:20 PM2023-08-21T15:20:05+5:302023-08-21T15:21:58+5:30

मे महिन्यापर्यंत कांदा दोन-तीनशे रुपये क्विंटल दराने विकला गेला तेव्हा सरकार झोपले होते. सोयाबीनला बरा भाव मिळत असताना सोयाबीन तेल आयात करून स्थानिक बाजारभाव पाडले.

Block the path of farmers' association! | येवल्यात शेतकरी संघटनेचा रास्ता रोको!

येवल्यात शेतकरी संघटनेचा रास्ता रोको!

googlenewsNext

भाऊराव वाळके

जळगाव नेऊर (जि. नाशिक) : केंद्र शासनाच्या ४० टक्के निर्यात मूल्य आकारणीचा शरद जोशी स्थापित शेतकरी संघटनेने सोमवारी सकाळी कृषी उत्पन्न बाजार समितीसमोर नगर - मनमाड रस्त्यावर ठिय्या मांडून रास्ता रोको आंदोलन करून निषेध नोंदवला.
केंद्र सरकारने कोणाची मागणी नसताना कांदा निर्यात शुल्कात वाढ करून शेतकऱ्याला आर्थिक संकटाच्या खाईत लोटण्याचे काम केले आहे. हे सरकार शेतकऱ्यांच्या हिताचे नाही हे सिद्ध केले आहे.

मे महिन्यापर्यंत कांदा दोन-तीनशे रुपये क्विंटल दराने विकला गेला तेव्हा सरकार झोपले होते. सोयाबीनला बरा भाव मिळत असताना सोयाबीन तेल आयात करून स्थानिक बाजारभाव पाडले. मे महिन्यात शेतकऱ्यांनी रस्त्यावर टोमॅटो फेकून दिले त्याचा लाल चिखल झाला. त्यावेळी सरकार झोपले होते; मात्र, मागील महिन्यात पुरवठा कमी मागणी जास्त झाली. त्यामुळे टोमॅटोला भाव मिळू लागताच नेपाळहून टोमॅटो आयात करण्याचे फर्मान काढले. कापसाच्या गाठी आयात करून कापसाचे भाव पाडले. मग, या सरकारला शेतकरीमुक्त भारत करायचा आहे का, असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला असल्याचे संघटनेने सांगितले.

शेतकरीविरोधी धोरणाचा शरद जोशी स्थापित संघटना तीव्र निषेध करते आणि कांदा निर्यात शुल्कात ४० टक्के केलेल्या वाढीचा निषेध म्हणून सोमवारी चक्का जाम करून नगर - मनमाड रस्त्यावर रास्ता रोको करण्यात आला. सर्व शेतकऱ्यांनी आजचे आंदोलन हे प्रातिनिधिक स्वरूपाचे असून, केंद्र सरकारने तातडीने चाळीस टक्के निर्यात मूल्य आकारणीचा अध्यादेश रद्द करावा; अन्यथा शेतकरी लोकप्रतिनिधींना रस्त्यावर फिरू देणार नाही आणि महाराष्ट्रभर तीव्र आंदोलन करण्यात येईल, याची केंद्र आणि राज्य सरकारने दखल घेण्याचा इशारा या प्रसंगी शेतकरी संघटनेच्या नेत्यांनी दिला.

या प्रसंगी शेतकरी संघटनेचे नेते संतू पाटील झांबरे, संध्या पगारे, संचालक, येवला कृषी उत्पन्न बाजार समिती, शेतकरी संघटनेचे येवला तालुका अध्यक्ष बाळासाहेब गायकवाड, बापूसाहेब पगारे, अरुण जाधव, जाफर पठाण, शिवाजी वाघ, सुरेश जेजूरकर, आनंदा महाले, राऊसाहेब गायकवाड, सुनील गायकवाड, नारायण बारहाते, नीलेश महाले, दत्तात्रय गायकवाड, प्रवीण गायकवाड आणि सर्व शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते, शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Web Title: Block the path of farmers' association!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Nashikनाशिक