गायरान वाचविण्यासाठी ग्रामस्थांचा रस्ता रोको

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 11, 2021 01:18 AM2021-09-11T01:18:40+5:302021-09-11T01:19:20+5:30

गेल्या २२ दिवसांपासून नवीबेज ग्रामस्थ ग्रामपंचायत हद्दीतील २०० हेक्टर गायरान व अवैध वृक्षतोड थांबविण्यासाठी सनदशीर आणि शांततेच्या मार्गाने महसूल, पोलीस, पंचायत समिती प्रशासनाचे लक्ष वेधत आहेत. मात्र प्रशासनाकडून ठोस उपाययोजना होत नसल्याच्या निषेधार्थ नवीबेज ग्रामस्थांनी गणेश जयंतीच्या मुहूर्तावर प्रशासनाच्या विरोधात एल्गार पुकारून कोल्हापूर फाट्यावर तासभर ठिय्या आंदोलन केले.

Block the villagers' road to save Gyran | गायरान वाचविण्यासाठी ग्रामस्थांचा रस्ता रोको

नवीबेज येथील गायरान संदर्भात कोल्हापूर फाट्यावर आयोजित रस्ता रोको आंदोलनप्रसंगी देवीदास पवार, धनंजय पवार ॲड. भाऊसाहेब पवार दीपक खैरनार घनश्याम पवार पोपट पवार व ग्रामस्थ.

Next
ठळक मुद्देनवीबेज : प्रशासनाच्या मध्यस्थीनंतर आंदोलन घेतले मागे

कळवण : गेल्या २२ दिवसांपासून नवीबेज ग्रामस्थ ग्रामपंचायत हद्दीतील २०० हेक्टर गायरान व अवैध वृक्षतोड थांबविण्यासाठी सनदशीर आणि शांततेच्या मार्गाने महसूल, पोलीस, पंचायत समिती प्रशासनाचे लक्ष वेधत आहेत. मात्र प्रशासनाकडून ठोस उपाययोजना होत नसल्याच्या निषेधार्थ नवीबेज ग्रामस्थांनी गणेश जयंतीच्या मुहूर्तावर प्रशासनाच्या विरोधात एल्गार पुकारून कोल्हापूर फाट्यावर तासभर ठिय्या आंदोलन केले.

नवीबेज गावातील सर्वपक्षीय नेते, पदाधिकारी पक्षीय झेंडे बाजूला ठेवून २०० हेक्टर गायरान वाचविण्यासाठी एकत्र आले आहेत. दरम्यान, आंदोलनस्थळी चर्चेदरम्यान गायरान कृती समितीचे नेते देवीदास पवार व प्रशासकीय यंत्रणेशी शाब्दिक चकमक उडाली. त्यामुळे आंदोलन अधिक तीव्र करण्याची भूमिका समितीचे नेते पवार यांनी घेतली तर पोलीस यंत्रणेने कायदेशीर कारवाई करण्याची भूमिका बोलून दाखवल्यामुळे आंदोलन तीव्र होण्याची चिन्हे असताना तहसीलदारांच्या मध्यस्तीने चर्चेदरम्यान आंदोलकांच्या दोन्ही मागण्या मान्य केल्याने रस्त्यावरील ठिय्या आंदोलन मागे घेण्यात आले. नवीबेज ग्रामपंचायत हद्दीतील २०० हेक्टर गायरानमधील १५ एकर जमिनीवरील वृक्षतोड अवैधरित्या सुरू असल्याचे ग्रामपंचायत यंत्रणेने व ग्रामस्थांनी निदर्शनास आणूनदेखील महसूल, वन, सामाजिक वनीकरण, पोलीस व पंचायत समिती प्रशासन त्या दोन आदिवासी माजी सरपंचावर गेल्या २२ दिवसापासून कुठलीही कारवाई करत नसल्याने दिवसेंदिवस वृक्षतोड होत आहे. प्रशासन मात्र गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर वेळकाढू धोरण अवलंबन करीत असल्याचे गायरान कृती समिती व ग्रामस्थांना निदर्शनास आल्यामुळे ग्रामस्थांनी आक्रमक होऊन कोल्हापूर फाट्यावर तासभर ठिय्या मांडून प्रशासकीय यंत्रणेचे लक्ष वेधले. जोपर्यंत त्या आदिवासीवर कारवाई होत नाही तोपर्यंत रस्त्यावरून उठणार नाही, अशी भूमिका आंदोलक ग्रामस्थांनी घेतल्यामुळे आंदोलनस्थळ परिसरात विशेष पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. यावेळी घनश्याम पवार, पोपट पवार, ॲड. भाऊसाहेब पवार, शरद निकम, तुळशीराम देवरे यांनी भूमिका स्पष्ट करून घटनास्थळावरील परिस्थिती स्पष्ट करून प्रशासनाचा समाचार घेतला. यावेळी धनंजय पवार, दीपक खैरनार, ॲड. भाऊसाहेब पवार, घनश्याम पवार पोपट पवार,साहेबराव पवार, नितीन खैरनार, विनोद खैरनार, मधुकर वाघ, चंद्रकांत पवार, हरी पवार, बाळासाहेब देवरे, प्रल्हाद देवरे, माणिक देवरे, बाळासाहेब खैरनार, दादा महाजन, नरेंद्र वाघ, विशाल वाघ, दीपक खैरनार शशिकांत खैरनार, रमेश खैरनार, नितीन पवार, समाधान पवार, दीपक पवार आदीसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

 

इन्फो

दोघांचा चर्चेस नकार

नबीबेज गावातील गट नं ८,११ व १२ या गायरान क्षेत्रातील वृक्षतोड देवरे वस्ती, बच्छाव वस्ती आणि सिडको वस्ती येथील आदिवासी बांधव अवैधरित्या करीत असून स्थानिक ग्रामस्थांशी झालेल्या चर्चेच्या फेऱ्यामध्ये या वस्तीवरील ७० आदिवासी बांधवांनी वृक्षतोड थांबविण्याचे मान्य केले. मात्र माजी सरपंच मधुकर गांगुर्डे आणि माजी सरपंच सरूबाई जाधव व सहकाऱ्यांना ग्रामस्थांनी चर्चेस बोलविले असता या दोन्ही माजी सरपंचांनी गायरानवर हक्क असल्याचे सांगून चर्चेस नकार दिला.

 

Web Title: Block the villagers' road to save Gyran

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.