मालेगावी शेतकऱ्यांचा रास्ता रोको
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 21, 2020 09:04 PM2020-07-21T21:04:27+5:302020-07-22T01:04:08+5:30
मालेगाव : गेल्या चार-पाच दिवसांपासून चकरा मारूनही युरिया मिळत नसल्याने तालुक्यातील संतप्त शेतकऱ्यांनी ंमंगळवारी दुपारी रास्ता रोको आंदोलन केले. तहसीलदार चंद्रजित राजपूत, तालुका कृषी अधिकारी व्यवहारे यांनी शेतकºयांची बैठक घेऊन तोडगा काढल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.

मालेगावी कॅम्प रस्त्यावर गेल्या काही दिवसांपासून युरिया घेण्यासाठी शेतकरी रांगा लावत आहेत. शिवाय युरियाची चढ्या दराने विक्री होत असल्याने ग्रामीण भागामध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. कोणतीही सूचना न देता युरिया संपला असा फलक लावण्यात आल्याने शेतकºयांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली. दिनेश ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. आंदोलनात डॉ. राजेंद्र ठाकरे, संदीप ठाकरे, दिनेश पवार, शुभम पवार, मीरा खोमणे, शाहूबाई दळवी, रामदास कचवे, अर्चना अहिरे, अमोल पवार, अशोक वाघ, अतुल अहिरे, जयवंता गरूड आदी शेतकºयांनी सहभाग घेतला होता.
पोलीस बंदोबस्त युरिया संपल्याने संबंधित शेतकºयांनी तालुका कृषी अधिकारी व्यवहारे यांच्याशी संपर्क साधला. त्यांनी बफर स्टॉकमध्ये चारशे गोण्या शिल्लक असल्याचे सांगितले. तहसीलदारांनी पुन्हा शेतकºयांची बैठक घेऊन शिल्लक असलेला युरिया वाटण्याची सूचना केली. त्यानुसार २५० शेतकºयांना प्रत्येकी एक-एक गोणी देण्यात आली. यावेळी पोलीस उपअधीक्षक रत्नाकर नवले, कॅम्प पोलीस ठाण्याचे निरीक्षक दिगंबर पाटील यांनी घटनास्थळी धाव घेत चोख पोलीस बंदोबस्त ठेवला होता.