गावागावात नाकाबंदी; नागरिकांकडून दक्षता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 15, 2020 10:42 PM2020-04-15T22:42:18+5:302020-04-15T22:42:31+5:30
तालुक्याला लागून असलेल्या चांदवड व मालेगाव तालुक्यात कोरोना संक्रमित रुग्ण सापडल्यामुळे देवळा तालुक्यात चिंतेचे वातावरण पसरले आहे. त्यातच चांदवड येथे सापडलेला कोरोना संक्रमित रुग्णाच्या संपर्कात आलेले तालुक्याच्या ग्रामीण भागातील तीन व देवळा शहरातील एकजण होम कॉरण्टाइन करण्यात आल्यामुळे शहरवासीयांच्या चिंतेत भर पडली आहे.
देवळा येथील सुभाष रोड परिसरात शहर प्रवेश-द्वाराचा मार्ग युवकांनी बंद केला आहे.
देवळा : तालुक्याला लागून असलेल्या चांदवड व मालेगाव तालुक्यात कोरोना संक्रमित रुग्ण सापडल्यामुळे देवळा तालुक्यात चिंतेचे वातावरण पसरले आहे. त्यातच चांदवड येथे सापडलेला कोरोना संक्रमित रुग्णाच्या संपर्कात आलेले तालुक्याच्या ग्रामीण भागातील तीन व देवळा शहरातील एकजण होम कॉरण्टाइन करण्यात आल्यामुळे शहरवासीयांच्या चिंतेत भर पडली आहे.
खबरदारीचा उपाय म्हणून तालुक्यातील अनेक गावात युवकांनी पुढाकार घेऊन गावात प्रवेश करण्याचे मार्गावर अडथळे निर्माण करून नाकेबंदी केली आहे. बाहेरगावाहून येणाऱ्या वाहनांना तसेच नागरिकांना गावात प्रवेश बंद करण्यात आला आहे. ग्रामीण भागात काही गावांमध्ये ग्रामस्थांनी पुढाकार घेऊन कोरोनाचा संसर्ग होण्यास संभाव्य कारण ठरणाºया गावठी दारूच्या भट्ट्या उद्ध्वस्त करण्याच्या घटना घडल्या आहेत.
कोरोनाविषयी सर्वत्र जागरूकता दिसू लागली आहे. देवळा शहरात सुभाष रोड, पंचायत समिती कार्यालय आदी भागातील शहराचे प्रवेश मार्ग बंद करण्यात आले असून, बाहेरगावाहून येणाºया नागरिकांवर पोलिसांबरोबरच शहरातील नागरिकही आता जातीने लक्ष ठेवून आहेत.
दि. १० एप्रिल ते १५ एप्रिलपर्यंत देवळा नगरपंचायत प्रशासनाने गावातील वैद्यकीय व्यवसाय, औषध विक्रीची दुकाने वगळता इतर सर्व किराणा, भाजीपाला, मांस विक्री आदींची दुकाने बंद केल्यामुळे ग्रामीण भागातून शहरात येणारे नागरिक आता बंद झाल्यामुळे शहरातील रस्ते, चौक ओस पडले आहेत.
उपविभागीय अधिकारी चांदवड यांच्या आदेशान्वये तोंडाला मास्क लावणे बंधनकारक करण्यात आले असून, मास्कचा वापर न करणाºया नागरिकांवर साथरोग प्रतिबंधक, आपत्ती व्यवस्थापन अधिनियम आदींद्वारे कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे.
- दत्तात्रेय शेजुळ, तहसीलदार
वाहन जप्तीची कारवाई
देवळा पोलिसांनी लॉकडाउन व संचारबंदीची कडक अंमलबजावणी सुरू केली असून, शहरासह ग्रामीण भागात पोलिसांची गस्त सुरू आहे. वाहनचालकांवर दंडात्मक किंवा वाहन जप्तीची कारवाई करण्यात येत आहे. यामुळे विनाकारण बाहेर फिरणाºया बेफिकीर नागरिकांना आळा बसला असून, कारवाईच्या भीतीमुळे हे नागरिक आता घराबाहेर पडेनासे झाले आहेत.