सिन्नरला आडव्या फाट्यावर नाकाबंदी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 22, 2021 04:14 AM2021-04-22T04:14:24+5:302021-04-22T04:14:24+5:30
----------------------------------------- दापूरला हाॅटेलला आग सिन्नर : तालुक्यातील दापूर येथील संजय लक्ष्मण आव्हाड यांच्या मालकीच्या गुरुकृपा हॉटेलमध्ये दुपारी आग लागून ...
-----------------------------------------
दापूरला हाॅटेलला आग
सिन्नर : तालुक्यातील दापूर येथील संजय लक्ष्मण आव्हाड यांच्या मालकीच्या गुरुकृपा हॉटेलमध्ये दुपारी आग लागून दुकानातील साहित्य जळून खाक झाले. या घटनेत टीव्ही, फर्निचर, फॅन, इतर वस्तू व रोख रुपये असा एकूण ७८ हजारांचा ऐवज जळून खाक झाला. माजी ग्रामपंचायत सदस्य योगेश आव्हाड, पोलीसपाटील ज्ञानेश्वर साबळे, बाळा वेताळे, भगवान गारे यांच्यासह नागरिकांनी घटनास्थळी येत मदतीचे आश्वासन देत धीर दिला.
-----------------------------------------
गरजूंना मदतीचे आवाहन
सिन्नर : गेल्यावर्षी एप्रिल महिन्यात लॉकडाऊनच्या काळात गरजूंना मदतीसाठी झटणारे हात यावर्षी मात्र अत्यल्प प्रमाणात दिसून येत आहेत. गेल्यावर्षी लॉकडाऊन झाल्यानंतर अनेक सामाजिक संघटना, कंपन्या, मंडळे यांच्यासह विविध संस्था गरजू लोकांच्या मदतीसाठी जीवनावश्यक वस्तू वाटताना दिसून आल्या. यावर्षी मात्र या सर्वांनी गरजूंच्या मदतीला हात आखडता घेतल्याचे चित्र आहे. गरजूंना मदत करण्याचे आवाहन करण्यात येत आहे.
----------------------------------
नगरोत्थान योजनेतून सिन्नरला निधी
सिन्नर : शहरातील उपनगरांमध्ये मुलभूत सुविधा देण्यासाठी सुवर्ण जयंती नगरोत्थान योजनेतून दोन कोटी ८१ लाख रुपयांची विकासकामे मंजूर झाल्याची माहिती आमदार माणिकराव कोकाटे यांच्या कार्यालयातून देण्यात आली. या योजनेतून सिन्नर नगरपालिका हद्दीतील विकासकामे मंजूर करण्याची मागणी पालकमंत्री छगन भुजबळ व जिल्हाधिकाऱ्यांकडे करण्यात आली होती. जिल्हाधिकाऱ्यांनी १६ कामांना मंजुरी दिली असून, दोन कोटी ८१ लाख ३२ हजार रुपयांतून ही कामे होणार आहेत.