नाशिकमधील रक्तपेढ्या बनल्या जीवनदायिनी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 14, 2019 01:35 AM2019-06-14T01:35:52+5:302019-06-14T01:38:08+5:30

‘रक्तदान महादान’, ‘रक्तदान जीवनदान’ अशा घोषवाक्यांद्वारे जनप्रबोधन केले जाते. नाशिक शहरात शासकीय व खासगी मिळून सुमारे दहा ते बारा रक्तपेढ्या कार्यान्वित असून, प्रत्येक रक्तपेढीमध्ये मागील वर्षभरात हजारो रक्तदात्यांकडून रक्तदान करण्यात आले आहे. गेल्या वर्षभरात शहरात एकूण सुमारे ६२ हजार १३४ रक्तदात्यांनी रक्तदान केले आहे.

The blood bank of Nashik becomes life-partner | नाशिकमधील रक्तपेढ्या बनल्या जीवनदायिनी

नाशिकमधील रक्तपेढ्या बनल्या जीवनदायिनी

googlenewsNext
ठळक मुद्देरक्तदात्यांची पंढरी : वर्षभरात एकूण ६२ हजार दात्यांकडून रक्तदान

अझहर शेख । लोकमत न्यूज नेटवर्क
नाशिक : ‘रक्तदान महादान’, ‘रक्तदान जीवनदान’ अशा घोषवाक्यांद्वारे जनप्रबोधन केले जाते. नाशिक शहरात शासकीय व खासगी मिळून सुमारे दहा ते बारा रक्तपेढ्या कार्यान्वित असून, प्रत्येक रक्तपेढीमध्ये मागील वर्षभरात हजारो रक्तदात्यांकडून रक्तदान करण्यात आले आहे. गेल्या वर्षभरात शहरात एकूण सुमारे ६२ हजार १३४ रक्तदात्यांनी रक्तदान केले आहे. त्यामुळे नाशिकची महिमा ही खरी रक्तदात्यांची पंढरी असे म्हणणे वावगे ठरू नये. तरुणाईने पुढाकार घेत ऐच्छिक रक्तदाता होण्याचा प्रयत्न करावा, असे आवाहन शहरातील रक्तपेढ्यांकडून करण्यात आले आहे.
रक्तदान हे श्रेष्ठ दान मानले गेले आहे. कारण एखाद्या व्यक्तीचा जेव्हा मृत्यूशी संघर्ष सुरू असतो तेव्हा मिळालेल्या रक्तामुळे त्याला जीवदान मिळू शकते. त्यामुळे रक्तदानाला विशेष महत्त्व प्राप्त आहे. सामाजिक संवेदनांची जाणीव ठेवून स्वयंस्फूर्तीने रक्तदान करत माणुसकी धर्म जोपासणे ही काळाची गरज आहे. शहरात रक्तदानाचे प्रमाण समाधानकारक जरी असले तरी उन्हाळ्यात काही रक्तगटांच्या रक्तपिशव्यांचा तुटवडा भासतो, असे रक्तपेढीचालक ांचे म्हणणे आहे. तसेच रक्तदानाचे प्रमाण जसे वाढत आहे, त्याचबरोबर शहरात रक्ताच्या गरजूंचीही संख्या वाढत आहे.
शहराजवळून मुंबई, पुणे, औरंगाबाद यांसारखे महामार्ग जातात तसेच जिल्हा आदिवासी तालुक्यांचा आहे. त्यामुळे नाशिकची रक्ताची निकड नक्कीच जास्त आहे. काही वर्षांमध्ये नाशिक शहरात ‘मेडिकल टुरिझम’देखील विकसित होऊ पाहत आहे. कर्करोग, हृदयरोग यांसारख्या आजारांवरही दर्जेदार उपचार करणारी रुग्णालये शहरात सुरू झाली आहेत. त्यामुळे रक्ताची गरज अधिकाधिक भासणे हे स्वाभाविक आहे. संकलित केलेले रक्त ४२ दिवसांपेक्षा जास्त काळ टिकवून ठेवता येत नाही.
जिल्हा रुग्णालयात मोफत रक्तपुरवठा
जिल्हा शासकीय रुग्णालयात येणाऱ्या गर्भवती महिला, अपघातातील जखमींसह विविध आजारांच्या रुग्णांना येथील शासकीय मेट्रो रक्तपेढीतून मोफत रक्तपुरवठा केला जातो. चालू वर्षात अद्याप २ हजार ७४४ रक्तपिशव्यांचे संकलन झाले असून, ३ हजार ३८० रक्तपिशव्या गरजूंना दिल्या गेल्या आहेत. तसेच मागील वर्षात एकूण ६ हजार ६३४ रक्तपिशव्यांचे संकलन करण्यात आले होते. वर्षभरात ९ हजार ६७८ गरजूंना मोफत रक्तपुरवठा करण्यात आल्याची माहिती रक्तपेढीचे जनसंपर्क अधिकारी गौरव शितोळे यांनी दिली.
रक्तदान कोणाला करता येते?
४ वयाची १८ वर्षे पूर्ण केलेली प्रत्येक निरोगी व्यक्ती तीन महिन्यांमधून एकदा रक्तदान करू शकते.
४ ज्या व्यक्तीचे वजन ४५ किलोपेक्षा अधिक आहे ती व्यक्ती.
४ रक्तदानासाठी रक्तामधील हिमोग्लोबिनचे प्रमाण महत्त्वाचे मानले जाते.
४ ज्या व्यक्तीचे रक्तातील हिमोग्लोबिनचे प्रमाण १२ टक्के इतके आहे.
४ प्रत्येक व्यक्तीच्या शरीरातून केवळ ३०० मिलिपर्यंत रक्त संकलित केले जाते.

Web Title: The blood bank of Nashik becomes life-partner

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.