‘मुक्तांगण’च्या वतीने रक्तदानाचे आवाहन

By admin | Published: November 30, 2015 10:43 PM2015-11-30T22:43:24+5:302015-11-30T22:45:23+5:30

‘मुक्तांगण’च्या वतीने रक्तदानाचे आवाहन

Blood donation appeal on behalf of 'Muktangan' | ‘मुक्तांगण’च्या वतीने रक्तदानाचे आवाहन

‘मुक्तांगण’च्या वतीने रक्तदानाचे आवाहन

Next

नाशिक : पुणे येथील मुक्तांगण व्यसनमुक्ती केंद्राच्या वतीने येत्या बुधवारी (दि. २ डिसेंबर) डॉ. अनिता अवचट यांच्या जन्मदिनानिमित्त रक्तदानाचे आवाहन करण्यात आले आहे.
व्यसनी व्यक्तींच्या व्यसनमुक्तीसाठी गेल्या तीस वर्षांपासून महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या ‘मुक्तांगण’च्या संस्थापक तथा डॉ. अनिल अवचट यांच्या दिवंगत पत्नी डॉ. अनिता अवचट यांचा जन्मदिन ‘मुक्तांगण’च्या वतीने यंदापासून ‘आनंदयात्री दिन’ म्हणून साजरा केला जाणार आहे. यानिमित्त रक्तदानाचे आवाहन केले जात आहे. नाशिककरांनीही जवळच्या रक्तपेढीत जाऊन रक्तदान करावे, असे आवाहन ‘मुक्तांगण’च्या नाशिक केंद्राचे समन्वयक माधव कोल्हटकर यांनी केले आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Blood donation appeal on behalf of 'Muktangan'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.